आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बद्रीनाथ धाम:वैदिक मंत्रोच्चारात सकाळी 4.30 वाजता उघडले कपाट, लॉकडाऊनच्या नियमांचे करण्यात आले काटेकोर पालन

बद्रीनाथएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कपाट उघडण्याचे विधी रात्री 3 पासूनच सुरु झाले होते

शुक्रवारी पहाटे 4.30 वाजता बद्रीनाथ मंदिराचे कपाट (दरवाजे) उघडण्यात आले. कपाट उघडण्याचे विधी रात्री 3 पासूनच सुरु झाले होते. रावल ईश्वर प्रसाद नंबूदरी यांच्या हस्ते विशेष पूजा करण्यात आली. या दरम्यान गुरु शंकराचार्यांची गादी, उद्धवजी, कुबेरदेवाची पूजा करण्यात आली. कपाट उघडल्यानंतर लक्ष्मी देवीची परिसर स्थित मंदिरात स्थापना करण्यात आली. भगवान बद्रीनाथ यांचा तिळाच्या तेलाने अभिषेक करण्यात आला.

धर्माधिकारी भुवनचंद्र उनियाल यांच्यानुसार श्री बद्रीनाथ धामचे कपाट मनुष्य पूजेसाठी पहाटे 4:30 वाजता उघडण्यात आले. उत्तराखंड चारधाम देवस्थान बोर्डाचे मीडिया प्रभारी डॉ. हरीश गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार बद्रीनाथ पुष्प सेवा समितीने 10 क्विंटल पेक्षा जास्त फुलांनी मंदिराला सजवले आहे.

लॉकडाऊनच्या नियमांचे पालन

प्रत्येक वर्षी हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये कपाट उघडले जातात, परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे कपाट उघडताना केवळ 28 लोक उपस्थिती होते. रावल नंबूदरी, धर्माधिकारी भुवनचंद्र उनियाल यांच्या व्यतिरिक्त येथे मंदिर समितीचे लोक, प्रशासनाचे अधिकारी आणि काही स्थानिक लोक उपस्थित होते. सर्वानी मास्क घातलेले होते. सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...