आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट:मथुरेतील मंदिरांत कान्हाच्या जन्माेत्सवाची तयारी सुरू; मथुरा, गाेकुळ, बरसानासह ब्रजच्या मंदिरांत पाळण्यांची सजावट

मथुरा / प्रमाेद कल्याण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रजच्या मंदिरांत कान्हाच्या आगमनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. श्रावणातील रिमझिम सुरू असतानाच मथुरेत द्वारकाधीश, गाेकुळ बरसाना, गाेवर्धनसह ब्रजल मंडळातील इतर मंदिरांत पारंपरिक पाळण्याची आकर्षक सजावट झाली आहे. वृंदावनातील मंदिरांत ठाकूरजींचे स्वागत आणि त्यांचा झाेका झुलण्याची भाविक जणू आतुरतेने प्रतीक्षा करू लागले आहेत.

बुधवारी हरियाली तीजच्या निमित्ताने बांकेबिहारी मंदिरात साेन्या-चांदीच्या पाळण्यात ठाकूरजी भक्तांना दर्शन देतील. याबराेबरच ब्रजभूमीमध्ये हिंडाेला उत्सवाला सुरुवात हाेईल. रिमझिम सरी आणि सुगंधित वातावरणात ठाकूरजी अनेकवेळा राधा-राणी, कधी सखींसह तर काहीवेळा एकटे हिंदाेळ्यावर बसून आनंद घेतात. भक्तांनाही त्यांच्या मनमाेहक मूर्तीच्या दर्शनाने धन्यता वाटू लागते. श्रावण लागताच मंदिरांत ठाकूरजींसाठी झाेके सजू लागतात. संपूर्ण महिनाभर दरराेज आकर्षक देखावे सजवले जातात. असे झाेके वेगवेगळ्या दिवशी फळ, फूल, मेवा, मखमल, राखी, साेसनी, चुनरीने सजवले जातात. त्यातही काळ्याकुट्ट ढगांचे दर्शन महत्त्वाचे मानले जाते. असे ढग, पाऊस, वीज असे वातावरण तयार केले जाते. माता यशाेदा दरराेज झाेका बदलते. त्यामुळे तिचा लल्ला आनंदाने त्यात बसून राहावा. ताे शांत झाेपला तर मातेला काम करता येऊ शकेल. हिंडाेलेची परंपरा ब्रजमध्ये पुष्टीमार्ग संप्रदायापासून सुरू झाली हाेती. वैष्णव संप्रदायाच्या सर्व शाखांनी देखील ही परंपरा स्वीकारली. ब्रज कला व संस्कृतीचे जाणकार डाॅ. भगवान मकरंद म्हणाले, पुष्टीमार्गात श्रीकृष्णाला बालस्वरूपात पूजले जाते. त्यामुळेच श्रावणात सर्व मंदिरांत बाळकृष्णासाठी पाळणे सजवले जातात. बांकेबिहारी मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार स्थानिक व बाहेरचे लाेक काेराेना नियमांना लक्षात घेऊन दर्शन करू शकतील. हरियाली तीजवर मंदिरात सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत सायंकाळी ४ ते १२ वाजेपर्यंत दर्शन हाेऊ शकतील. ठाकूरजी झाेपाळ्यात सकाळी ११ वाजता स्वार हाेतील. बांके बिहारी मंदिरा व्यतिरिक्त राधावल्लभ मंदिर, राधारमण मंदिर, राधा स्नेह बिहारी मंदिर, राधा दामाेदर मंदिर, श्रीकृष्ण बलराम मंदिर, प्रेम मंदिर इत्यादी ठिकाणी सजवलेल्या झाेपाळ्यात ठाकूरजी विराजमान हाेतील आणि दर्शन देतील.

साेन्या-चांदीपासून बनलेल्या ६.१६ काेटींच्या झाेपाळ्यात ७४ वर्षांपूर्वी ठाकूरजी विराजमान
बांके बिहारी मंदिराचा झाेपाळा १ हजार ताेळे साेने, २ हजार ताेळा चांदी, रत्नजडीत आहे. त्याची किंमत सुमारे ६.१६ काेटी रुपये आहे. मंदिर व्यवस्थापक मुनीश शर्मा म्हणाले, १९४६ मध्ये सेठ हरगुलाल बेरीवाल यांनी ताे बनवला हाेता. वाराणसीच्या कारागीर लल्लूने वर्षभर नक्षीकाम करून साेन्या-चांदीचा मुलामा देऊन ३० बाय ४० फुटांचा झाेपाळा सजवला. दाेन्ही बाजूने सखी बनवल्या. ठाकूरजींना रेशीम व साेन्या-चांदीचे नक्षीकाम असलेला रंगपाेषाख परिधान केला जाताे. १५ आॅगस्ट १९४७ राेजी ठाकूरजी पहिल्यांदा या झाेपाळ्यावर विराजमान झाले हाेते. तेव्हापासून ही परंपरा सुरू करण्यात आली आहे. झाेपाळ्याच्या मागील बाजूस जगमाेहनमध्ये ठाकूरजी यांच्यासाठी सेज तयार केली जाते. त्यात श्रृंगाराची व्यवस्था आहे. कारण झाेपाळ्याच्या हवेमुळे त्यांचा श्रृंगार खराब हाेताे.

बातम्या आणखी आहेत...