आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेशोत्सव 2020:स्वतः चंद्रदेवाने येथे केली आहे श्रीगणेशाची स्थापना, महाराष्ट्रातील 56 गणेश स्थानात लिंबागणेश-भालचंद्र गणेशाचा समावेश

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लिंबागणेश या गावाचे नाव असे का पडले यामागेही एक रोचक कथा आहे

लिंबागणेश हे गाव भालचंद्र गणपतीचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील 56 गणेश स्थानात लिंबागणेश-भालचंद्र गणेशाचा समावेश आहे. या गणपतीची स्थापना स्वतः चंद्रदेवाने केली असून याचा उल्लेख पुराणात आढळून येतो. आज आम्ही तुम्हाला या मंदिराविषयी काही खास गोष्टी सांगत आहोत.

बीड जिल्ह्यातील लिंबागणेश येथील गणपती प्रसिद्ध आहे. चंद्राने गणपतीची उपहास केला, त्यावेळी गणेशाने दिलेल्या शापातून चंद्राला मुक्त करण्यासाठी सर्व देवतांनी लिंबागणेश येथे गणेशाची उपासना करून गणेशाची मूर्ती स्थापन केली. त्या गणेशाला भालचंद्र, असे म्हणतात. मंदिर परिसरात दगडी कासव, होमकुंड, प्रदक्षिणा मार्ग, मंडपामागे मोठी दीपमाळ, प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. मंदिराचा प्रकार फरसबंदी असून भक्कम तटबंदी आहे. जवळच दगडी बांधणीची एक पुष्करणी असून तिला चंद्रपुष्करणी असे म्हणतात. पुष्करणीच्या जवळच एक समाधी असून ती लिंबासूराची असल्याचे सांगितले जाते.

श्रीगणेशाने चंद्रदेवाला दिला होता शाप...
प्राचीन काळी कैसाल पर्वतावर श्री गणेश व षडानन यांच्यामध्ये काही कारणावरून वाद चालू होता. त्यावेळी गणेशाच्या रुपाला पाहून चंद्रदेव हसले. चंद्राचे हे कुत्सित हसणे पाहून श्रीगणेशाला राग आला. या क्रोधाच्या भरात गणेशाने चंद्राला शाप दिला की, हे चंद्र तुझे हे तेज नाहीसे होऊन तू तेजोहीन होशील. या शापामुळे चंद्र तेजोहीन झाला. तो खूप दुःखी झाला. उद्विग्न अवस्थेत सैरभर भटकू लागला, भटकत असताना त्याला गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर एक रम्य ठिकाण दिसले. तो प्राईसर पाहून प्रसन्न अंतःकरणाने चंद्रदेवाने तेथे कठोर तपश्चर्या सुरु केली. काही काळाने श्रीगणेश चंद्रदेवावर प्रांत झाले आणि त्यांना पुन्हा तेजस्वी होण्याचे वरदान दिले. एवढेच नाही तर दार संकष्टी चतुर्थीला जे भाविक उपवास करून तुझ्या दर्शनाशिवाय अन्न सेवन करणार नाहीत. परंतु माझा जन्म भाद्रपद शु. चतुर्थीला झाला असल्यामुळे या दिवशी तुझे तोंड कुणी पाहणार नाही. त्यानंतर चंद्रदेवाने येथे श्रीगणेशाची स्थापना केली.

चंद्रपुष्कर्णी तीर्थ - या ठिकाणी चंद्रदेवाने तपश्चर्या केली होती.
चंद्रपुष्कर्णी तीर्थ - या ठिकाणी चंद्रदेवाने तपश्चर्या केली होती.

लिंबागणेश या गावाचे नाव असे का पडले यामागेही एक रोचक कथा आहे
लिंबागणेश हे गाव अत्यंत प्राचीन असून या गावाच्या नावाविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. अनेक वर्षांपूर्वी या परिसरात लिंबासूर नावाचा एक राक्षस राहत होता. तो अत्यंत बलाढ्य व क्रूर होता. त्याने परिसरातील भक्तांना त्रस्त केले होते. त्याच्या त्रासाला कंटाळून भक्तांची भालचंद्र गणेशाची आराधना केली आणि लिंबासूरापासून मुक्ती मिळवण्यासाठी याचना केली. भक्तांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री भालचंद्रने लिंबासूराचा वध केला. मरण्यापूर्वी लिंबासूराने माझ्या नावाने हा परिसर ओळखला जावा अशी इच्छा व्यक्ती केली. त्यामुळे या गावाला लिंबागणेश असे नाव पडले. आजदेखील मंदिराचा उत्तरेला लिंबासुरची समाधी आहे.भालचंद्र गणेश मंदिर गावाच्या आग्नेय दिशेस असून मंदिराच्या बाजूने गणेशी नावाची नदी वाहते. इ.स. 16 व्या शतकात हे मंदिर बांधले असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. मंदिर हेमाडपंती आहे.मंदिराच्या गाभाऱ्यात दोन्ही बाजूला भालदार, चोपदार आहेत.सभामंडपात गणेशवाहन, मूषकमूर्ती विराजमान आहेत.मंदिराचा जीर्णोद्धार शके 1830 मध्ये श्री. भवानीदास भुसरी यांनी केल्याचा उल्लेख मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिलालेखातून मिळतो.मंदिराच्या समोर भव्य दीपमाळ आहे.मंदिराच्या चारही बाजूला संरक्षण भिंत आहे.मंदिराचा गाभारा पूर्ण घडीत पाषाणाचा आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser