आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यपूजेचा दिवस:भानु सप्तमी 8 मे रोजी, सूर्याला अर्घ्य दिल्याने मन राहते शांत आणि वाढते स्मरणशक्ती

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भानु सप्तमी हा दिवस हिंदू धर्म आणि धर्मग्रंथांमध्ये अतिशय शुभ मानला जातो. रविवारी सप्तमी तिथीच्या संयोगात 'भानु सप्तमी' उत्सव साजरा केला जातो. यावेळी 8 मे रोजी सप्तमी तिथी आहे. भानू सप्तमीच्या दिवशी भगवान सूर्यनारायणाचे व्रत ठेवून त्यांची पूजा केल्याने अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते. सूर्याला ऊर्जेचे प्रतिक म्हटले जाते. असे मानले जाते की, या दिवशी सूर्याची मनापासून पूजा केल्यास सर्व प्रकारची पापे आणि दुःखे नष्ट होतात. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि मनात शांती राहते, असे शास्त्रात सांगितले आहे.

तांब्याच्या भांड्याने अर्घ्य द्यावे
1.
सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि मनापासून सूर्यदेवाची पूजा करावी.
2. तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी भरावे. त्यात लाल चंदन, अक्षत, लाल फुले टाकून ‘ॐ सूर्याय नमः’ म्हणत सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
3. आदित्य हृदय स्तोत्र किंवा सूर्य स्तोत्र पठण करा. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर सूर्याच्या 12 नामांचा जप करा.
4. शेवटी सूर्यदेवाला हात जोडून दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करा. या उपवासात दिवसभर मीठ खाऊ नये.

व्रत आणि उपासनेचे फायदे
सूर्यदेवाला सर्व ग्रहांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. या दिवशी जे भक्त सूर्यदेवाची पूजा करताना आदित्य हृदयम् आणि इतर सूर्य स्तोत्रांचे पठण करतात आणि जे श्रवण करतात त्यांनाही शुभ फळ प्राप्त होतात. या दिवशी जो कोणी सकाळी उठून भानू सप्तमीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळतो त्याला अपेक्षित फळ मिळते. या दिवशी गंगेत स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करणाऱ्या भक्ताला दीर्घायुष्य, सुदृढ शरीर प्राप्त होते आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही असेही मानले जाते. जे भक्त या विशेष दिवशी दान पुण्य करतात, त्यांचे घर नेहमी धन आणि धान्याने भरलेले राहते.

बातम्या आणखी आहेत...