आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदिर उभारणी:अयोध्या मंदिराच्या भूमिपूजनास 60 दिवस पूर्ण; चार पिलर्स बांधून तयार; मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ठरते वेगळेपण

लखनऊ7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दररोज येतेय 50 लाखांचे दान, आजवर 138 कोटी रु. दान प्राप्त

अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनास ६० दिवस पूर्ण झाले आहेत. दरम्यान, चाचणीसाठी पायाभरणीत उभारलेल्या चार खांबांची उभारणीही पूर्ण झाली आहे. भूमिपूजनानंतर सर्वसामान्य लोकांकडून मिळणाऱ्या दानाची रक्कम वाढते आहे. विश्वस्तांच्या खात्यात दररोज ५० लाख रुपये जमा होत आहेत. आतापर्यंत १३८ कोटी रुपये जमा झाले आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी अंदाजे ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे बांधकाम ३ वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. विश्वस्तांनी एल अँड टी कंपनीस बांधकामाचे कंत्राट देण्याचे निर्धारित केले आहे. या कंपनीस बांधकामासाठी लागणारी अवजड उपकरणे आणण्यासाठी २९.५ कोटी रुपये अॅडव्हान्स देण्यात आले आहेत. एक हजार किलोवॅटच्या विजेची जोडणी देण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास १००० केव्ही पॉवर जनरेटर बसवण्यात येणार आहे.

मंदिराच्या बांधकामासाठी परिसरातील मानस भवनातील पोलिस, पीएसी व सीआरएफ कंपनीची कार्यालये व निवासस्थाने रिकामी करून घेतली जात आहेत. मानस भवन पाडण्यात येणार आहे. येथे मंदिराचे सिंहद्वार उभे राहणार आहे. चाचणीसाठी १५ ऑक्टोबर रोजी पायाभरणीसाठी १००-१०० फुटांचे ४ पिलर उभारले आहेत. २८ दिवसांनंतर त्यांच्या क्षमतेची चाचणी आयआयटी, चेन्नईच्या तज्ज्ञांकडून करवून घेतली जाईल. विश्वस्त संस्थेचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले, चाचणी झाल्यानंतर आणखी १२०० पिलर्स उभारण्याचे काम सुरू होईल. ट्रस्टमधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले, देशातील एका प्रतिष्ठित उद्योगपतींनी सिमेंट दानात देण्याची घोषणा केली आहे.

मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ठरते वेगळेपण
- मंदिर शुद्ध नागर शैलीनुसार बांधकाम होणारे उत्तर भारतातील हे पहिले मंदिर आहे. सोमनाथ मंदिरास तटबंदी नाही. खजुराहोचे कंदरिया महादेव मंदिर ११ व्या शतकापूर्वी बांधण्यात आले होते. मंदिराचे अष्टकोनी गर्भगृह एकाच दगडास कापून तयार केले असावे.
- भव्य गर्भगृहात सोने-चांदी व नवरत्ने बसवण्यात येतील.
- मंदिर लाल दगडात बांधण्यात येत आहे.
- मंदिराच्या तिन्ही मजल्यांवर देवदेवतांची शिल्पे व नक्षीकाम केलेले ४०० खांब असतील.
- ७० एकर जमिनीवर १६१ फूट उंचीचे उत्तर भारतातील पहिले मंदिर असेल.
- मंदिराच्या मुख्य शिखरांसह सर्व पाच शिखरे सोन्याने मढवलेली असतील.
- ५ एकरांत बांधण्यात येणाऱ्या मुख्य मंदिराच्या पायाभरणीत १०० ते १५० फूट खोल १२०० पिलर्स असतील.
- तटबंदीसह पिलर्सची संख्या ४ हजार असेल.
- हे पिलर्स मंदिराचा पाया असतील.
- अयोध्येच्या कोणत्याही ठिकाणावरून मंदिराचे शिखर सहज पाहू शकाल.
- मंदिराच्या तटबंदीवर प्रवेश करताच गर्भगृहात विराजमान रामलल्लांचे दर्शन होईल.
- चबुतऱ्यावर ५१-५१ फुटांची ६ मंदिरे असतील.
- मंदिरात इंटिग्रेटेड लाइट सिस्टिम असेल. त्यांना सौरऊर्जेपासून प्रकाश मिळेल.
- मंदिराच्या चोहोबाजूंनी सीता व अशोकाची झाडे दिसतील.
- एक लाख भाविकांना दर्शनाची सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था कडेकोट राहणार आहे.

आता एसी वुडन कॉटेजमध्ये विराजमान रामलल्ला व बाल हनुमान
प्रभू श्रीरामलल्ला चार भावंडे आणि हनुमानासह बांधकामस्थळाजवळील एसी वुडन कॉटेजमध्ये विराजमान आहेत. दर्शनास येणाऱ्या भाविकांची संख्या आता मर्यादित ठेवण्यात आली आहे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत रामलल्ला येथेच असतील.

बातम्या आणखी आहेत...