आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अध्यात्मिक:मुलांच्या शरीराबरोबरच आत्म्याकडेही लक्ष द्या

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येक जण शरीराची काळजी घेतो, परंतु आता आपण मुलांच्या आत्म्याकडेही लक्ष देण्यास सुरुवात केली पाहिजे...

आपण सर्वच आपल्या कुटुंबासाठी खूप काही करू इच्छितो. त्यातही विशेषत: पालक मुलांच्या आनंदासाठी आपले संपूर्ण आयुष्य देतात. मुलांनी नेहमीच आनंदी व निरोगी राहावे आणि ते जे काही करतील त्यात यश मिळावे, अशी त्यांची इच्छा असते. परंतु मुले निरोगी, आनंदी असावीत, यशस्वी व्हावीत यासाठी आपण कोणती दक्षता घेतली पाहिजे? एका शरीरात दोन गोष्टी असतात - शरीर आणि आत्मा. मूलदेखील एक मनुष्य, आत्मा आणि शरीर आहे. म्हणून आपल्याला आत्मा आणि शरीर दोन्हीचेही पालन करायचे आहे. परंतु, कधी कधी जे दिसते त्यावर आपले लक्ष केंद्रित असेत आणि जे दिसत नाही त्याकडे लक्ष जात नाही.

आपण शरीराची देखभाल करण्यासाठी बरेच काही करतो. त्यांना चांगली घरे, चांगले भोजन देते. मुले चांगल्या शाळेत जातील याची काळजी घ्या. आपला पाल्य नोकरीला गेल्यावर यशस्वी व्हावा, यासाठी पालक मुलाला त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त शिकवतात. हा शुद्ध हेतू आहे, परंतु हे सर्व दिसणारे पालन आहेत. म्हणजे आपण आपल्या मुलाचे संपूर्ण आयुष्य पाहतो. ते हे करतील, मग ते अभ्यास करतील, त्यांना इतके मार्क मिळतील, ते असे बनतील, मग त्यांना यश मिळेल, मग त्यांना कीर्ती, मानसन्मान, संपत्ती मिळेल. हे सर्वकाही दिसत असलेले पालन आहे.

निरोगी व यशस्वी होण्यासाठी परिपूर्ण असण्याबरोबरच अदृश्य आत्माही परिपूर्ण असावा. पालक मुलाला कसे बोलायचे ते शिकवतात. त्यामुळेच ते प्रत्येकाला सर्व काही सांगू शकतात. फक्त काय बोलावे हेच नव्हे, तर कसे बोलायचे तेदेखील शिकवले. भावना, भाव सर्व काही शिकवले, परंतु एक छोटी गोष्ट आता शिकवायची आहे व ती म्हणजे विचार कसा करावा? आपण बोलणे, चालणे, शिकणे, लिहिणे, काम करणे शिकवतो, पण योग्य विचार करण्यास शिकवत नाही. योग्य विचार करणे मुलाला कोण शिकवते? पालक, शाळा, कॉलेज शिकवते का? आपल्याला वाटते, विचार आपोआप येतात. वेळ-काळ, परिस्थिती, वर्तणुकीनुसार विचार आपोआप येतात.

आपण त्यांना योग्य विचार करण्यास शिकवून भावनिकदृष्ट्या मजबूत बनवावे. आईवडिलांना कितीही वाटले, त्यांनी मुलाला परिपूर्ण करण्यासाठी कितीही परिश्रम घेतले तरी आपल्याला माहीत आहे की काहीही नेहमीच परिपूर्ण नसते. चढ-उतार, यश-अपयश ही एक जीवनयात्रा आहे. आपण शरीराबरोबरच त्यांना मनानेही मजबूत केले तर त्यांच्या आयुष्यात जे काही घडेल तेव्हा ते नेहमी भावनिकदृष्ट्या दृढ राहतील. त्यासाठी आत्म्याचे पालन करावे लागेल, त्याला ऊर्जेने भरावे लागेल. ही प्रत्येक आई-वडिलांची जबाबदारी आहे.

आत्म्याचे पालन म्हणजे विचार करण्याची पद्धत. दुसरे म्हणजे योग्य निर्णय घेण्याची पद्धत आणि तिसरे म्हणजे श्रेष्ठ संस्कार. कारण आत्मा मन, बुद्धी आणि संस्कार अशा तीन विषयांनी बनलेला आहे. मन विचार करते, बुद्धी निर्णय घेते आणि मग आपण ते कृतीत आणतो. आपण पुन्हा पुन्हा केलेले कर्म आपले संस्कार बनतात. आत्म्याच्या तीन भूमिका असतात. तो विचार करतो, निर्णय घेतो व यामुळे त्याचे संस्कार निर्माण होतात. या तिघांनाही त्यांच्या पालकांचे पालन करायचे आहे. पालन करणे म्हणजे आत्म्याला इतका सामर्थ्यवान बनवणे की आत्म्याचा प्रत्येक विचार योग्य असावा. परिस्थिती योग्यच असावी, हे आवश्यक नाही. लोकांचे त्याच्याशी योग्य वर्तन असावे, हेही आवश्यक नाही. कोणीही त्याच्याशी कसाही वागू शकेल. जीवनात काहीही अचानक घडू शकते. परंतु, प्रत्येक परिस्थितीत मुलाने योग्य विचार करावा, आपले कर्म तपासून नेहमी योग्य निर्णय घ्यावा. योग्य निर्णय घेऊन तो कृती करेल तेव्हा त्याची उत्कृष्ट मूल्ये तयार होतील. प्रत्येक आई-वडिलांना हेच हवे असते. त्यांचे मूल आनंदी, शांत, शहाणे, शुद्ध असावे, शक्तिशाली बनावे. हेच सर्व आत्म्याचे खरे संस्कार आहेत. प्रत्येक जण शरीराची काळजी घेतो, परंतु आता आपल्याला आत्म्याकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. तरच मुलांचे आयुष्य आनंदी होईल.

बी. के. शिवानी
ब्रह्मकुमारी

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser