आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत ऊर्जा:आत्मशक्तीला आवाहन, व्रत-जागरणाने आत्म्याचे देवत्व

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लवकरच नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. आपण एकत्रितपणे शक्तीला आवाहन करू. आपण तिला शक्तीही म्हणतो, आईदेखील म्हणतो, तिला अस्त्र-शस्त्रांसह आणि तिच्या पायाशी राक्षसही दाखवतो. या सगळ्यामागे काय ज्ञान आहे? आपण ज्या शक्तींना आवाहन करत आहोत त्या कोणत्या आहेत आणि कोठून येतील? देवत्व आणि पावित्र्य हे आत्म्याचे मूलभूत गुणधर्म आहेत. आपण आपले देवत्व विसरतो तेव्हा आपल्यातील काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे दोष उदयास येतात. एखाद्याला ते लाक्षणिक पद्धतीने दाखवायचे असेल तर तो ते कसे दाखवेल? उदा. इथे धोका आहे, असे दाखवायचे आहे. मग आपण एक चित्र काढतो. तर, असुर प्रतीकात्मक आहेत. वास्तवात त्या आपल्यातील आसुरी प्रवृत्ती आहेत म्हणजे नकारात्मकता, कमकुवतपणा, विकार, मत्सर, द्वेष इ. आपण आतील असुरांना जागृत केले आहे. आता आतील देवत्व जागृत करण्याचा काळ आला आहे. यामुळे वाईट गोष्टी संपतील. आज आपण ज्या देवत्वाचे आवाहन धावा करत आहोत ते आपल्या आतच आहे आणि जे राक्षस पायाखाली दाखवतो तेदेखील आपल्या आतच आहेत.

देवींचे आठ हात आत्म्यामधील आठ शक्तींचे प्रतीक आहेत. प्रत्येक हातामध्ये एकेक शस्त्र दाखवले आहे. म्हणजेच, आत्मा ज्ञानाची शक्ती वापरेल तेव्हा देवत्व उदयास येईल. अष्टभुजाधारी म्हणजे आठ शक्तींचा दिव्य आत्मा. आज आपण सहज म्हणतो की, माझ्यामध्ये शक्तीच नाही. मी प्रत्येकाशी जुळवून घेऊ शकत नाही. असे म्हणत आपण आपल्या आंतरिक शक्ती कमी केल्या आहेत. हे नऊ दिवस शक्तींचे आवाहन करायचे आहे. यासाठी आधी जागरण करायचे आहे. जागरण म्हणजे अज्ञानाच्या झोपेतून जागे होणे. मग आपण नऊ दिवस व्रत करू. व्रत फक्त फक्त खाण्या-पिण्याचे नाही, तर आपण नऊ दिवस रागावणार नाही, परचिंतन करणार नाही, कोणाबद्दल चुकीची चर्चा पसरवणार नाही, सकाळी लवकर उठून ध्यान करणार, नऊ दिवसांत काहीही चुकीचे खाणार-पिणार नाही, हेही व्रत करायचे आहे. आत्म्याची शक्ती वाढवणारे व्रत करायचे आहे.

तिसरे आहे सात्त्विक अन्न. देवत्व आणि सात्त्विकता दोघेही एकत्र असतात. तामसी अन्न खाल्ल्यास देवत्व जन्माला येणार नाही. सात्त्विक अन्न म्हणजे शुद्ध शाकाहारी (कांदा-लसूण नसलेले), पण त्याच वेळी देवाच्या स्मरणात बनवलेले. सात्त्विक मनाने तयार केलेले अन्न सात्त्विक मार्गाने मिळवलेल्या पैशातून मिळाले. मग ते सात्त्विक मनाने तयार केल्यास तो प्रसाद बनतो. आपण सात्त्विक अन्न खाण्यास सुरुवात करत आहोत, तेव्हा असाही विचार करू की फक्त नऊ दिवसच का? दैवी जीवन फक्त नऊ दिवसच हवे की कायमचे? सण आपल्याला जीवन जगण्याची पद्धत शिकवतात. आपण जे नऊ दिवस करू शकतो, ते आयुष्यभरही करू शकतो. पण नऊ दिवसांत हे लक्षात ठेवा की, प्रतिज्ञा फक्त तोंडाने करायची नाही. सक्तीने केलेल्या प्रतिज्ञेने आत्म्याचे सामर्थ्य वाढणार नाही.

आपण नऊ दिवस दिवाही लावतो, तो आत्म्याचे प्रतीक आहे. ‘मी आत्मा आहे’ ही भावना उदयास येईल तेव्हा ती ज्योत जळत राहील आणि त्याचा प्रकाश सर्वत्र पसरेल. दिवा जळत राहतो तेव्हा जीवन शुभ होते, असे म्हणतात. आता कोणता दिवा प्रज्वलित ठेवायचा - प्रेमाचा, आदराचा, सहकार्याचा, सर्वांचा आणि निरंतरतेचा. जागरण, सात्त्विकता, व्रत आणि दिवा हे सर्व केले जाते तेव्हा आपली नाती खूप गोड होतात. एकमेकांशी जुळवून घेणे, सहकार्य करणे, ही जगण्याची नैसर्गिक पद्धत होते.

या सहकार्याचे प्रतीक रास आणि गरबा आहे. प्रत्येकाच्या हातात दोन काठ्या असतात. एखाद्याची काठी पाहून दुसऱ्याने त्या काठीवर हळुवार मारले आणि अगदी सामंजस्याने असे केले तर ते एक अतिशय सुंदर नृत्य बनते. स्वतःचीच काठी मारत असाल तर ते नृत्य युद्धभूमी बनते. ज्यांच्यासोबत आपण राहतो आणि काम करतो असे हे लोक आहेत. त्यांचे संस्कार पाहा आणि त्यांना पाहत आपले संस्कार वापरा.

देव म्हणतो की, जो जीव व्रत-जागरण करतो, त्याच्या जीवनात सात्त्विकता येते. आत्म्याची चेतना त्याला स्वाभाविकपणे मिळते. ती इतरांबरोबर संस्कारांचा रास करते. आपल्याला फक्त देवींचेच नव्हे, तर आपल्यातील दैवी शक्तीचेही आवाहन करायचे आहे. ती शक्ती आपल्या जीवनात कशी आणायची, त्याचा व्यावहारिक जीवनात कसा उपयोग करायचा, हाही विचार करायचा आहे. त्याचबरोबर कोणती देवी त्या शक्तीचे प्रतीक आहे, ती आपल्याला काय शिकवत आहे? या गोष्टी आपण नऊ दिवसांत समजून घेतल्या तर आपण खऱ्या अर्थाने नवरात्रोत्सव साजरा करू.

दैवी जीवन फक्त नऊ दिवस हवे आहे की कायमचे? सण आपल्याला जीवन जगण्याची पद्धत शिकवतात. आपण जे नऊ दिवस करू शकतो, ते आयुष्यभरही करू शकतो.

बी. के. शिवानी

बातम्या आणखी आहेत...