आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक:या दिवाळीमध्ये मनावरील डागांचीही स्वच्छता करूया

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिवाळी मनाच्या आतही साजरा करण्याचा सण आहे. घराबरोबरच मनाचा कोपरान् कोपरा स्वच्छ करा...

दिवाळी म्हणजे आत्म्याची ज्योत जागृत होणे. दिवाळी म्हणजे एकमेकांना आशीर्वाद देण्याची, जुन्या गोष्टी, एकमेकांकडे अडकलेली जुनी खाती संपवून नवे वर्ष, नवे पर्व सुरू करण्याची वेळ.

दिवाळीच्या काही दिवस आधी आपण घराची स‌फाई सुरू करतो. याला आपण मनाच्या स्वच्छतेचीही जोड द्यायला हवी. दिवाळीच्या वेळी स्वच्छता वेगळ्या पातळीवर जाते हे आपण पाहतो. दररोज आपण वरवरची सफाई ​​करतो. कधी कधी वस्तू उचलून कपाटांमध्ये ठेवल्या जातात. परंतु वस्तू इतक्या साठतात की कोणी चुकून ते कपाट उघडते तेव्हा बरेच काही बाहेर येते. आयुष्यातही असेच घडते. आपण लोकांशी अतिशय प्रेमळपणे बोलतो, खूप चांगले वागतो, आपल्याला वाटते की प्रत्येकाबरोबरचे आपले नाते खूप चांगले आहे. परंतु, आपल्या मनात काय आहे हे आपण तपासत नाही. आपण विचार वेगळा करतो आणि त्यांच्याशी वेगळेच बोलतो. आपल्याला काहीही करण्याची इच्छा नसते, परंतु त्यांना खुश करण्यासाठी काही करतो. त्यांनी माझ्याबाबत असे का केले? परंतु संबंध महत्त्वाचे आहेत म्हणून मला चांगले वागले पाहिजे. ही साफसफाई बाहेरची होत होती, परंतु अनेक जुन्या गोष्टी मनाच्या आत आणि कोपऱ्यात साठल्या आहेत. आपण त्याकडे सरळ मार्गाने पाहिले तर आपल्याला त्यांची मूल्ये, त्यांचे वर्तन आवडत नाही. आपल्याला त्यांची कामाची पद्धत आवडत नाही, पण आपण सर्वांशी चांगले आहोत. परंतु, सर्व काही करूनही आपले संबंध बळकट आधारावर उभे राहत नाहीत, हे आपण पाहतो. कोणी एखादा शब्द बोलतो तेव्हा बरेच काही बाहेर येते. मग आपण तोंडातून निघून गेले, असे म्हणून माफी मागतो. ती गोष्ट मनामध्ये नसेल तर ती तोंडातून बाहेर पडणार नाही.

दिवाळी आली आहे. घराबरोबरच मनाचा कोपरान् कोपराही स्वच्छ करा. याशिवाय आपण लक्ष्मीचे आवाहन करू शकणार नाही. म्हणजेच आतील पावित्र्य, देवत्वाला आवाहन करणे. जिथे जुन्या गोष्टी साठलेल्या असतील तिथे पावित्र्य कसे येईल? जिथे कोणाबद्दल काही साठवून ठेवलेले असेल तिथे स्वच्छता कशी असेल! असा काही तरी जुना मळ आहे जो आपल्याला मळ वाटत नाही. कारण आपल्या मनातील ते डाग आयुष्याचाच एक भाग बनले आहेत. आपल्याला हे माहीतही नाही की हा डाग आहे. हे आपले खरे संस्कार नाहीत. दिवाळी म्हणजे प्रत्येक कोपरा स्वच्छ करणे. पुढील काही दिवस स्वत:बरोबर बसा. मनाचा प्रत्येक कोपरा तपासा, जिथे आपण यापूर्वी कधीही गेला नव्हता तेथे जा. बालपणात काही तरी घडले होते, वीस वर्षांपूर्वी काही घडले होते, कोणी तरी काही तरी सांगितले होते, कोणी तरी काही तरी केले होते. ते काढायचे आहे. कारण आत्म्यावरील डाग आपला एक भाग होतो. त्याचा परिणाम आपल्या वर्तमानावरही होतो. आत्म्याने शरीर सोडल्यावर आपले डाग आपल्याबरोबर जातात.

पृथ्वीवर दिवाळी आणायची असेल तर मागील अनेक जन्मांपासून आणलेले डाग प्रत्येक आत्म्याला साफ करावे लागतील. उदा. कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही, कोणीही माझा आदर करत नाही, माझी कोणाला किंमतच नाही, कोणाही माझा वापर करून सोडते. हे आवाज आत सुरू राहतात तेव्हा आत्म्याचे पावित्र्य संपते. आपण सर्वांशी चांगले राहतो, पण स्वतःशी चांगले बोलत नाही. आपणच आपले मन किती मलिन करतो. चुकीची विचारसरणी हा एक डाग आहे आणि योग्य विचारसरणीमुळे तो डाग मिटतो. तर, ज्ञानाद्वारे देवाचे स्मरण व सामर्थ्याने आपल्या मनावरील डाग दूर करायचे आहेत, तरच जीवनात दिवाळी येईल.

दिवाळी हा फक्त बाहेर नव्हे, तर मनाच्या आतही साजरा करण्याचा सण आहे. ते त्यांचे संस्कार आहेत, तो त्यांचा दृष्टिकोन आहे, ही त्यांची मानसिक स्थिती आहे, तो त्यांचा मूड आहे. आपल्याकडूनही कधी चूक होते तेव्हा आपण स्वतःवरच टीका करतो. आपल्या चुका आतल्या आत पुन्हा पुन्हा आठवत राहतो. चूक झाली, ती पुन्हा कधीही होणार नाही, असा विचार करायचा आहे आणि आत्मटीकेचे डाग दूर करायचे आहेत. स्वत:ला वेळ द्या मनाचा कोपरान् कोपरा धुंडाळून जुने डाग मिटवून टाका, तरच दिवाळी साजरी करण्यासाठी आपले मन स्वच्छ होईल.

शिवानी दीदी ब्रह्मकुमारी

बातम्या आणखी आहेत...