आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्संग:ज्ञान आहे, पण कळेल कसे?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्तनात दिसत नसेल तर ज्ञानाचा अर्थ काय?

शिक्षण तर भरपूर घेतले, माहिती आहे, मात्र तरीही स्वत:मध्ये बदल होत नाहीये? स्वत:मध्ये बदल घडवण्यासाठी इच्छुक असणारे काही जण असाच विचार करत आहेत. एका बोधकथेतून याबाबत जाणून घेऊ.

एक जण नियमितपणे बुद्धांचे विचार ऐकायचा. हे काही महिने सुरू होते. मात्र ए‌वढा वेळ गेल्यानंतरही स्वत:मध्ये काही बदल न जाणवल्याने, तो खूप चिंताग्रस्त झाला. एके दिवशी प्रवचनानंतर सर्व लोक गेल्यानंतर तो बुद्धांजवळ जाऊन म्हणाला, भगवान, मी दीर्घकाळापासून एक चांगला माणूस बनण्यासाठी तुमचे प्रवचन सातत्याने एेकतोय. मात्र यामुळे माझ्यात कुठलाही बदल झालेला नाही. यावर बुद्ध हास्य करत म्हणाले, तू कोणत्या गावाहून आला आहेस? यावर तो माणूस म्हणाला, पिपली गावाहून. नंतर बुद्धांनी विचारले की, गाव किती दूर आहे? जवळपास दहा कोस, त्याने सांगितले. बुद्धांनी पुन्हा विचारले, तू तुझ्या गावी कसा जातोस? यावर ती व्यक्ती म्हणाली, पायीच जातो, मात्र असे का विचारत आहात? बुद्धांनी परत विचारले की, येथे बसल्या-बसल्या तू तुझ्या गावी पोहोचशील असे शक्य आहे का? असे तर अजिबातच शक्य नाही, ती व्यक्ती म्हणाली. 

बुद्ध म्हणाले, आता तुला उत्तर मिळाले. तुला तुझ्या गावाचा रस्ता माहिती आहे, मात्र प्रयत्न न करता, पायी न जाता तू तेथे कसा पोहोचशील? याच प्रकारे तुझ्याकडे ज्ञान आहे आणि तू जर ते अमलात आणत नसशील तर तू स्वत:ला एक चांगली व्यक्ती बनवू शकत नाहीस. ज्ञान आपल्या वर्तनात दिसणे अत्यावश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...