आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुखी जीवनासाठी चाणक्य नीती:नेहमी बुद्धिमान लोकांसोबत राहावे, घरामध्ये कलह आणि अन्नाचा अपमान करू नये

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मूर्ख व्यक्तीसोबत राहणारे आणि बुद्धिवान लोकांचा अपमान करणारे नेहमी दुःखी राहतात

आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टींकडेही लक्ष दिल्यास, दैनंदिन जीवनातील विविध समस्या दूर होण्यास मदत होते. आचार्य चाणक्यांनी जीवनात सुख-शांती कायम ठेवणारे काही सूत्र सांगणाऱ्या नीती शास्त्राची रचना केली होती. चाणक्य नीतीचा अवलंब केल्यास प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, यातील एक चाणक्य नीती...

आचार्य चाणक्य म्हणतात....
मूर्खा यत्र न पूज्यन्ते धान्यं यत्र सुसन्चितम्।
दाम्पत्ये कलहो नास्ति तत्र श्री: स्वयमागता।।

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, ज्या घरामध्ये मुर्खांचा नाही तर, बुद्धिमान लोकांचा योग्य मन-सन्मान केला जातो, त्याठिकाणी महालक्ष्मी सदैव निवास करते. ज्या घरामध्ये पर्याप्त अन्न असते कोणीही उपाशी झोपत नाही, त्या घरामध्ये महालक्ष्मी सदैव निवास करते.

ज्या घरामध्ये घरी आलेल्या पाहुण्यांचे योग्य स्वागत केले जाते, मांसाहार केला जात नाही, त्याठिकाणी महालक्ष्मी सदैव निवास करते. ज्या घरामध्ये पती-पत्नी सदैव प्रेमाने राहतात, घरात कलह करत नाहीत त्याठिकाणी महालक्ष्मी निवास करते.

जे लोक मूर्खांची पूजा करतात, म्हणजेच मुर्खांना जास्त महत्त्व देतात त्यांची सेवा करतात ते कधीही यशस्वी होत नाहीत. नेहमी दुःखी राहतात. ज्याठिकाणी धन-धान्याचा अपमान केला जातो, संग्रह केला जात नाही, पती-पत्नी नेहमी भांडत राहतात अशा ठिकाणी देवी लक्ष्मी थांबत नाही. यामुळे मूर्ख लोकांसोबत राहू नये.