आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पूजा-पाठ / चैत्र नवरात्रीमध्ये दिवा लावून देवीसमोर करावा मंत्र जप, अधार्मिक कार्यापासून दूर राहावे

Aurangabad6 महिन्यांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • 25 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत चैत्र मास नवरात्री, या काळात करावा देवी मंत्रांचा जप

बुधवार, 25 मार्चपासून चैत्र नवरात्री सुरु होत आहे. दुर्गा पूजेचा हा 9 दिवसीय उत्सव गुरुवार 2 एप्रिलपर्यंत चालेल. नवरात्रीमध्ये करण्यात आलेल्या देवी पूजेने सर्व अडचणी दूर होऊ शकतात. या दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा आणि देवीच्या इतर मंत्राचा जप करण्याचे विशेष महत्त्व आहे. हे मंत्र लवकर सकारत्मक प्रभाव दाखवतात. मंत्रांचा जप करताना कोणतीही चूक होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मंत्राचा उच्चार स्पष्ट असावा. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. अधार्मिक कार्यापासून दूर राहावे.  उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यांकडून जाणून घ्या, देवीचे काही खास मंत्र आणि सोपा जप विधी...

हा आहे मंत्र जपाचा सोपा विधी
नवरात्रीमध्ये सकाळी लवकर उठावे. स्नान करून पवित्र व्हावे आणि घरातच सुरुवातीला श्रीगणेश आणि नंतर देवी दुर्गाची पूजा करावी. पूजेमध्ये देवीला अभिषेक करावा, वस्त्र अर्पण करावे. फुल अर्पण करून धूप-दीप लावून आरती करावी. त्यानंतर आसनावर बसून मंत्राचा जप करावा. मंत्र जप करण्यासाठी लाल चंदन, स्फटिक किंवा रुद्राक्ष माळेचा उपयोग करावा. मंत्र जपाची संख्या कमीत कमी 108 असावी.

मंत्र 1- ऊं ह्रीं दुं दुर्गायै नम:
या मंत्राचा जप केल्याने सर्व अडचणींमधून मुक्ती मिळू शकते.

मंत्र 2- सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके, शरंयेत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।
या मंत्राचा जप केल्याने देवी आपल्या भक्ताचे कल्याण करते. 

मंत्र 3- ऊँ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
या मंत्राचा जप केल्याने मोठ्यातील-मोठी समस्या नष्ट होऊ शकते.

मंत्र 4- ऊँ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै।
चामुंडा देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो.

या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे
या मंत्राचा स्पष्ट आणि योग्य उच्चार करून जप करावा. मंत्र जप उच्चारामध्ये चूक झाल्यास जपाचे फळ प्राप्त होत नाही, याउलट प्रभाव पडू शकतो. ज्या लोकांना मंत्र योग्य उच्चार करणे शक्य नसेल त्यांनी एखाद्या योग्य ब्राह्मणाकडून जप करून घ्यावा. चुकीच्या कामापासून दूर राहावे. मंत्र जप करणाऱ्या व्यक्तीने पूर्ण मनाने धार्मिक कर्म करावेत.

0