आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चाणक्य नीती:सुखी राहायचे असल्यास मूर्ख व्यक्तीपासून राहावे दूर, कधीही त्याला उपदेश देऊ नये, अन्यथा आपलेच नुकसान होते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाणक्य नीती : या 3 लोकांचे चांगले करूनही दुःखच पदरी पडेल

सुखी आणि यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्यांनी नीती शास्त्रामध्ये विविध सूत्र सांगितले आहेत. जे लोक या नीतीचे पालन करतात त्यांच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतात. आचार्य चाणक्यांनी एका नीतीमध्ये तीन अशा लोकांबद्दल सांगितले आहे, ज्यांचे भले करून देखील आपल्याला दुःख मिळण्याची शक्यता राहते. चाणक्य नीतीनुसार या तीन लोकांपासून दूर राहण्यातच आपले हित आहे.

मूर्खशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च।
दु:खिते सम्प्रयोगेण पण्डितोऽप्यवसीदति।।

हा चाणक्य नितीमधील पहिल्या अध्यायातील चौथा श्लोक आहे. यामध्ये चाणक्यांनी सांगितले आहे की, काही लोकांचे भले करूनदेखील दुःखच प्राप्त होते.

मूर्खाशिष्योपदेशेन म्हणजे मूर्ख शिष्याला उपदेश देणे
एखाद्या मूर्ख व्यक्तीला उपदेश देऊ नये. मूर्ख व्यक्ती नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी चुकीचा तर्क-वितरक करत राहतो. यांना समजून सांगणे खूप कठीण काम आहे. एखादा श्रेष्ठ व्यक्तीसुद्धा एखाद्या मुर्खाला विद्वान बनवू शकत नाही. यामुळे मूर्ख लोकांसमोर ज्ञानाच्या गोष्टी करू नयेत, अन्यथा आपल्यालाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.

वाईट स्वभावाची स्त्री
जर एखादी स्त्री वाईट स्वभावाची असेल आणि तिला फक्त पैशांचा मोह असेल तर पुरुषाने अशा स्त्रीपासून दूरच राहावे. समजूतदार पुरुष तोच आहे, जो अधार्मिक स्त्रीपासून दूर राहतो. धर्माच्या मार्गावरून भटकलेल्या स्त्रीचे भरण-पोषण केल्यानेही यश प्राप्त होत नाही. वाईट स्वभावाच्या स्त्री संपर्कात राहिल्यास कुटुंब आणि समाजात अपयशाची प्राप्ती होते.

विनाकारण दुःखी व्यक्ती
जे लोक विनाकारण दुःखी राहतात, नेहमी देवाला दोष देत राहतात, आहे त्या सुख-सुविधांमध्ये संतुष्ट राहत नाहीत, इतरांचे सुख पाहू शकत नाहीत अशा लोकांपासून नेहमी दूरच राहण्यामध्ये शहाणपण आहे. हे लोक नेहमी दुःखी राहतात आणि जो व्यक्ती यांच्या संपर्कात येतो त्यालाही व्यर्थ गोष्टी सांगून-सांगून दुःखी करतात.