आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ज्येष्ठ पौर्णिमा:आज रात्री 11.15 वाजत दिसेल मांद्य चंद्रग्रहण, असणार नाही सुतक काळ

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कसे होते मांद्य चंद्र ग्रहण
Advertisement
Advertisement

शुक्रवार 5 जूनच्या रात्री चंद्रग्रहण होईल. परंतु हे मांद्य म्हणजे छायाकल्प ग्रहण राहील. अमेरिका स्पेस एजन्सी नासानुसार हे ग्रहण युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिसेल. भारतामध्ये आज रात्री 11.15 वाजता हे ग्रहण सुरु होईल आणि 2 वाजून 35 मिनिटांनी संपेल. हे ग्रहण मांद्य असल्यामुळे याचे धार्मिक मान्यता नाही. सुतक काळही राहणार नाही. आज ज्येष्ठ मासातील पौर्णिमा आहे आणि या तिथीशी संबंधित पूजन कर्म आज केले जाऊ शकतात.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हे ग्रहण मांद्य राहील. मांद्य म्हणजे मंद होण्याची क्रिया. या ग्रहणात चंद्राच्या कला कमी-जास्त होताना दिसणार नाहीत परंतु चंद्राची चमक कमी होईल. आशियातील काही देश, यूएस इ, ठिकाणी हे ग्रहण दिसेल. या ग्रहणामध्ये चंद्रासमोर धुळीप्रमाणे सावली दिसेल. यावर्षी 10 जानेवारीलाही असेच चंद्रग्रहण झाले होते. यानंतर 5 जुलै आणि 30 नोव्हेंबरलाही मांद्य ग्रहण होईल.

कसे होते मांद्य चंद्र ग्रहण

चंद्र आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी आल्यावर चंद्रग्रहण बघता येते. एरवी पृथ्वीची गडद छाया चंद्रावर पडत असल्याने ते खग्रास किंवा खंडग्रास ग्रहण असते. पण, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून प्रवास करतो तेव्हा त्या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जातो. त्यामुळे चंद्रावर गडद सावली दिसत नाही.या चंद्रग्रहणाला मांद्य चंद्रग्रहण असेही एक नाव आहे.

पौर्णिमेला कोणकोणते शुभ काम केले जाऊ शकतात

ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची कथा ऐकावी. गरजू लोकांना धन आणि धान्य दान करावे. शिवलिंगावर जल अर्पण करून ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप करावा.

Advertisement
0