आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रग्रहण:26 मे राेजी बुद्धपाैर्णिमेला पूर्ण चंद्रग्रहण दिसणार नसल्याने मंदिरे बंद हाेणार नाहीत, ना हाेणार सुतक नियमांचे पालन

उज्जैन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुद्धपाैर्णिमा म्हणजे २६ मे राेजी पूर्ण चंद्रग्रहण आहे. हे देशाचा ईशान्य भाग आसाम, पश्चिम बंगाल आणि आेडिशाच्या काही भागात दिसेल. उर्वरित भारतात हे दिसणार नाही. त्यामुळे जेथे ग्रहण दिसणार नाही तेथील मंदिरे ना बंद हाेतील ना अन्य धार्मिक परंपरांचे पालन केले जाईल. २०२१ मध्ये एकूण चार ग्रहणे असून चारही भारतात दिसणार नाहीत. वैशाख पाैर्णिमा ज्याला बुद्धपाैर्णिमा असेही म्हणतात, हे वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण असेल. त्यानंतर १० जून राेजी सूर्यग्रहण, १९ नाेव्हेंबरला खग्रास चंद्रग्रहण आणि १४ डिसेंबरला खग्रास सूर्यग्रहण असेल.

जिवाजी वेधशाळेचे अधीक्षक डाॅ. राजेंद्र गुप्त म्हणाले, २६ मे राेजी चंद्रग्रहण दुपारी २.१६ वाजता सुरू हाेईल. भारतात या वेळी दिवस असल्याने ते दिसणार नाही. हे ग्रहण संध्याकाळी ७.२१ वाजता सुटेल. ज्याेतिषाचार्य पं. आनंदशंकर व्यास म्हणाले, ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाचे सुतक पाळण्यात येणार नाही तसेच ग्रहण सुटल्यावर दान-पुण्यही केले जाणार नाही. जेथे ग्रहण दिसते त्या ठिकाणी सुतक आणि ग्रहण सुटल्यानंतर अंघाेळ व दानाचे महत्त्व असते. पं.मनीष शर्मा म्हणाले, २३ मार्चला शनी वक्री असल्याने संपूर्ण जगाला काेराेना संसर्गापासून दिलासा मिळण्याची आशा आहे. आॅगस्टनंतर हे प्रमाण आणखी कमी हाेईल. शनी वक्री असणे हा व्यापाराच्या दृष्टीनेदेखील चांगला काळ ठरणार आहे. सर्वच व्यावसायिकांसाठी ताे अनुकूल असेल. व्यापाऱ्यांना सरकारी धाेरणांची विशेष काळजी घ्यावी लागेल.

२३ पासून ग्रहबदल, मंगळ - शनी ५९ वर्षांनी समाेरासमाेर
काही ज्याेतिष्यांच्या म्हणण्यानुसार येेणारा काळ युद्धासारखी परिस्थिती घेऊन येणार आहे. २ जून ते २० जुलैपर्यंत असा ग्रहांचा याेग असेल, ज्यामुळे ५९ वर्षांनंतर म्हणजे १९६२ सारखी (भारत-चीन युद्ध) स्थिती बनू शकते. ज्याेतिषी पं. मनीष शर्मा म्हणाले, २३ मे राेजी शनी मकर राशीत वक्री हाेईल. मकर हा शनीच्या स्वत:च्या राशीचा स्वामी आहे. या दरम्यान, २ जून ते २० जुलै (सुमारे ४८ दिवस) पर्यंत मंगळ कर्क या नीचेच्या राशीत संक्रमण करेल. देश आणि जगासाठी हा काळ खूप कठीण असेल. या ४८ दिवसांमध्ये जेव्हा मंगळ, सूर्य, गुरू, शनी ग्रह एकत्र येतील त्या दिवशी भयानक नैसर्गिक, विमान किंवा इतर अपघात होऊ शकतात. २० जुलै रोजी मंगळ व शनी यांची परस्परांवरील दृष्टी कमी झाल्यानंतर जगाला दिलासा मिळेल.

बातम्या आणखी आहेत...