आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाशिवरात्री:शिवलिंगाची पूजा करताना करावा महामृत्युंजय मंत्राचा जप, यामुळे दूर होतो तणाव आणि मिळते शांतता

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 11 मार्चला महादेव आणि देवी पार्वती पूजेचा पर्व महाशिवरात्री आहे. शिव पूजेमध्ये महामृत्युंजय मंत्राचे विशेष महत्त्व आहे. या मंत्र जपाने मोठमोठ्या अडचणी दूर होऊ शकतात. मृत्यूचे भय नष्ट होते. शत्रूंवर विजय प्राप्त होतो. या मंत्र जपाने तणाव दूर होतो.

महामृत्युंजय मंत्र
ऊँ भूर्भुवः स्वः ऊँ त्रयम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारूकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्।।

या मंत्राचा सरळ अर्थ असा आहे की, आम्ही तीन नेत्र असलेल्या शिवशंकराची पूजा करत आहोत, महादेवच प्रत्येक जीवामध्ये शक्तीचा संचार करतात. संपूर्ण सृष्टीचे पालन-पोषण करतात. महादेवाकडे आम्ही प्रार्थना करतो की, त्यांनी आम्हाला मृत्यूच्या बंधनातून मुक्त करून मोक्ष प्रदान करावा.

# महामृत्युंजय मंत्र जपाने दूर होतात हे दोष
> महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मंगळीक दोष, नाडी दोष, कालसर्प दोष, दृष्ट, रोग, वाईट स्वप्न, वैवाहिक जीवनातील समस्या, अपत्य बाधा आणि इतरही दोष दूर होतात.

# मिळते दीर्घायुष्य
> दीर्घायुष्याची इच्छा असलेल्या व्यक्तीने नियमितपणे महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. भगवान शिव यांना मृत्यूचे देवता मानले जाते. हा मंत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे. या मंत्राचा जप करणाऱ्या व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते.

# आरोग्य प्राप्ती
> हा मंत्र आजारपणापासून रक्षण करतो. शरीर निरोगी राहते आणि त्वचा उजळ होते.

# यश (सन्मान) प्राप्ती
> या मंत्राचा जप केल्याने भक्ताला समाजात उच्च स्थान प्राप्त होते आणि सन्मान मिळतो.

# मंत्र जप करताना लक्षात ठेवा या गोष्टी
1
. जप करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर एखाद्या शिव मंदिरात जाऊन किंवा घरातच शिवलिंगाची पूजा करावी.
2. पूजेमध्ये शिवलिंगावर जल, दूध, दही, तूप, मध, खडीसाखर या गोष्टी अवश्य अर्पण कराव्यात. दिवा लावावा.
3. बिल्वपत्र, धोतरा, हार-फुल महादेवाला अर्पण करावेत. कापूर लावून आरती करावी.
4. त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा कमीत कमी 108 वेळेस जप करावा. मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ वापरावी.
5. मंत्राचा उच्चार अगदी स्पष्ट असावा.
6. एखाद्या शिव मंदिरात शिवलिंगासमोर पूर्व दिशेने मुख करून या मंत्राचा जप करावा.
7. महादेवाच्या पूजेमध्ये स्वच्छता आणि पवित्रतेकडे विशेष लक्ष द्यावे.
8. सर्व प्रकारच्या अधार्मिक कार्यापासून दूर राहावे, अन्यथा पूजेचे फळ मिळणार नाही.
9. मंत्र जप करणाऱ्या व्यक्तीने कधीही आई-वडील आणि आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींचा अपमान करू नये.

बातम्या आणखी आहेत...