आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Dharm
  • Chaturthi Of Krishna Paksha In Margashirsha Month Today | Sunday And Chaturthi; Sun And Shriganesha Worship | Marathi News

मार्गशीर्ष मासातील कृष्ण पक्षाची चतुर्थी आज:रविवार आणि चतुर्थीचा योग; श्रीगणेश पूजेसह सकाळी सूर्याला आणि संध्याकाळी चंद्राला अर्पण करावे जल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी (11 डिसेंबर) मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी आहे. भगवान श्रीगणेश हे या तिथीचे स्वामी असून सूर्य रविवारचा कारक ग्रह आहे. श्रीगणेश आणि सूर्य या दोघांचाही पंचदेवांमध्ये समावेश आहे. त्यामुळे रविवारच्या चतुर्थीचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

उज्जैनचे ज्योतिषी पं. मनीष शर्मा यांच्या मते एका महिन्यात दोन चतुर्थी येतात. एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात. या तिथीला घरात सुख-समृद्धी टिकून राहावी या इच्छेने श्रीगणेशाचे व्रत आणि पूजा केली जाते. चतुर्थीचा उपवास करणारे दिवसभर अन्न खात नाहीत. फळ खाऊ शकतात. संध्याकाळी चंद्र उदयानंतर श्रीगणेश आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते.

श्रीगणेश पूजेमध्ये 12 मंत्रांचा जप करावा
ऊँ सुमुखाय नम:, ऊँ एकदंताय नम:, ऊँ कपिलाय नम:, ऊँ गजकर्णाय नम:, ऊँ लंबोदराय नम:, ऊँ विकटाय नम:, ऊँ विघ्ननाशाय नम:, ऊँ विनायकाय नम:, ऊँ धूम्रकेतवे नम:, ऊँ गणाध्यक्षाय नम:, ऊँ भालचंद्राय नम:, ऊँ गजाननाय नम: या मंत्रांच्या जपाने केलेली उपासना लवकर सफल होते.

श्रीगणेशाला दुर्वा, हार-फुले, मोदक, अबीर-गुलाल, हंगामी फळे अर्पण करावीत. दिवा लावून आरती करावी.

रविवारी सूर्य उपासना करावी
रविवारी सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे. ऊँ सूर्याय नम: मंत्राचा जप करावा. या दिवशी सूर्यदेवाच्या मूर्तीचीही पूजा करावी. धूप आणि दिवे लावून आरती करावी. सूर्य ग्रहासाठी गूळ आणि पिवळे वस्त्र दान करावे.

संध्याकाळी चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करावे
चंद्रदेवाचीही विशेष पूजा चतुर्थीला केली जाते. या तिथीला संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर चांदीच्या भांड्यातून चंद्राला दूध अर्पण करावे. जल अर्पण करावे, दुधापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. धूप आणि दिवे लावून आरती करावी. चंद्रदेवाच्या मूर्तीची किंवा फोटोचीही पूजा करू शकता.

चतुर्थीला या वस्तूंचे करावे दान
चतुर्थीला पूजेसोबत धन आणि धान्य दान करावे. गोठ्यात हिरवे गवत दान करावे. सध्या थंडीची वेळ आहे, त्यामुळे गरजूं लोकांना लोकरीचे कपडे, तीळ, गूळ दान करावे. मंदिरात पूजा साहित्य अर्पण करावे.

बातम्या आणखी आहेत...