आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा 2022:आपट्याच्या झाडाचीच पाने सोनं म्हणून का देतात, कुबेराने का पाडला होता सोन्याचा पाऊस

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 5 ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा होत आहे. नऊ दिवस देवीची उपासना केल्यानंतर दहावा दिवस असतो विजयादशमीचा. म्हणजेच सोने लुटण्याचा. दस-याच्या दिवशी लोक एकत्र येतात. आपटा व शमीच्या पानांमुळे अर्जुन योग येतो. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दस-याला सोने लुटले जाते. पुराणामध्ये सीमोल्लंघन, सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत. आज कुमार गुरुजी जोशी- सांगत आहेत, सोनं लुटण्यामागची कथा...

सोनं लुटण्यामागची कथा
सोनं लुटण्यामागची कथा रघुराजाच्या काळची आहे. वरतंतू ऋषींचा कौत्स नावाचा एक शिष्य होता. या शिष्याने चौदा विद्यामंध्ये प्रावीण्य संपादन केले. त्यानंतर गुरूऋणातून उतराई होण्यासाठी त्याने गुरूंना गुरुदक्षिणेबद्दल विचारले. त्यावर गुरूंनी विद्या लोकांच्या कल्याणासाठीच उपयोगात आण हीच माझी गुरू दक्षिणा, असे सांगितले. मात्र शिष्याने जास्तच आग्रह केला. तेव्हा गुरूंनी सांगितले की, चौदा विद्यांच्या बदल्यात चौदा कोटी सुवर्णमुद्रा दे. गुरूंना वाटले कौत्स आता गुरूदक्षिणेचा नाद सोडून देईल.

परंतु शिष्य कौत्स याने गुरुदक्षिणा देण्यासाठी प्रभू रामचंद्रांचे वंशज रघुराजा यांच्या दरबारी गेला. त्याला तिथे समजले की राजा रघु हे राज्यत्याग करून वानप्रस्थाश्रमात गेले आहे. वानप्रस्थाश्रम म्हणजे सर्व सुख-सुविधांचा त्याग करून वनामध्ये देवाचे नामस्मरण करत आयुष्य जगणे. परंतु कौत्स्य त्यांना शोधत वनात गेला आणि त्यांची भेट घेऊन त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. परंतु त्यावेळी रघु राजाकडेही एवढे द्रव्य नव्हते म्हणून त्यांनी सर्व मंत्र्यांना बोलावून इंद्रदेवावर आक्रमण करण्याचे ठरवले.

इंद्रदेवही युद्धासाठी सज्ज झाले. परंतु तेवढ्यात तेथे नारदमुनी आले आणि त्यांनी इंद्रदेवाला सांगितले की, राजा रघु कोणत्या कारणामुळे युद्ध करण्यासाठी येत आहेत, याविषयीआधी त्यांच्याशी चर्चा करा. त्यांनतर स्वतः इंद्रदेव राजा रघूंकडे गेले आणि युध्दमागचे कारण विचारले. त्यावर रघु राजाने संपूर्ण कहाणी इंद्रदेवाला सांगितली. त्यानंतर इंद्रदेवाने कुबेरदेवाला तेथे बोलावले आणि अयोध्येवर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडण्यास सांगितले.

कुबेराने नगरीच्या वेशीबाहेर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. या सुवर्ण मुद्रा ज्या झाडा वर पडल्या ते झाड आपट्याचे होते. त्या घेऊन जा म्हणून रघु राजाने कौत्साला सांगितले. 14 कोटींपेक्षा एकही जास्त सुवणमुद्रा त्याने घेतली नाही. दिलेले दान कुबेरही कसा परत घेणार. शेवटी त्या सुवर्णमुद्रा नगरजनांनी लुटून न्याव्यात असा सुवर्णमध्य काढण्यात आला. तो दिवस होता विजयादशमीचा. म्हणून सीमोल्लंघन करून सोने लुटून नेले जाते.

बातम्या आणखी आहेत...