आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Dharm
  • Datta Jayanti 2022 | Margashirsha Purnima 2022 Date Kadhi Aahe Puja Vrat Vidhi; Dattatreya Jayanti Importance | Marathi News

मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा दोन दिवस:दत्तात्रेय जयंती बुधवारी, 8 डिसेंबरला स्नान-दान आणि उपवासाची पौर्णिमा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा दोन दिवस चालेल. यामुळे 7 तारखेला दत्त पौर्णिमा उत्सव तर 8 डिसेंबरला पौर्णिमेचे स्नान-दान करण्यात येणार आहे. उदय तिथीला गुरुवारी पौर्णिमा असेल असे ज्योतिषी सांगतात. म्हणूनच मार्गशीर्ष पौर्णिमा व्रत आणि पूजा 8 तारखेला करावी. दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबरपासून मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सुरु होईल.

दत्त पौर्णिमेला शुभ योग
7 डिसेंबरला सिद्ध आणि सर्वार्थसिद्धी योग राहील. ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा अवतार असलेल्या दत्तात्रेयाची या शुभ मुहूर्तांमध्ये पूजा केली जाईल. भगवान दत्तात्रेयांचा जन्म या तिथीला प्रदोषकाळात म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी झाला होता. यावेळी त्यांचे पूजन करण्यात येणार आहे. शुभ संयोगात त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

8 डिसेंबर रोजी स्नान-दान आणि उपवासाची पौर्णिमा
गुरुवार, 8 डिसेंबर रोजी पौर्णिमा तिथी सकाळी साडेआठपर्यंत राहील. पौर्णिमा तिथीला सूर्योदय झाल्यामुळे या दिवशी स्नान-दान आणि व्रत करणे शुभ राहील. या दिवशी भगवान श्रीविष्णूची विशेष पूजा आणि उपवास केला जाईल. या तिथीला सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नद्यांच्या पाण्यात स्नान करण्याची परंपरा आहे. तुम्ही हे करू शकत नसल्यास, पाण्यात गंगाजलचे काही थेंब टाकून तुम्ही घरी स्नान करू शकता.

बातम्या आणखी आहेत...