आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा तिथी बुधवार, 7 डिसेंबर रोजी आहे. या दिवशी भगवान दत्तात्रेयांची जयंती साजरी केली जाते. बुधवारी पौर्णिमा आणि दत्तात्रेय जयंती असल्याने हा शुभ योग बनला आहे. या दिवशी पूजेबरोबरच नदीत स्नान करून दानधर्म करण्याची परंपरा आहे.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते, मार्गशीर्ष पौर्णिमेला केलेल्या धर्म-कर्मामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते. अक्षय पुण्य म्हणजे ज्याचा प्रभाव आयुष्यभर राहतो. या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे. तुमच्या शहरात किंवा शहराजवळ वाहणाऱ्या पवित्र नदीत स्नान करावे आणि स्नानानंतर सूर्याला जल अर्पण करून दिवसाची सुरुवात करावी.
नदीत स्नान केल्यानंतर नदीकाठावरील गरजू लोकांना पैसे, धान्य, लोकरीचे कपडे दान करा. गोशाळेतील गायींची काळजी घ्या. हिरवे गवत आणि धन दान करावे.
पौर्णिमेला नदीत स्नान करणे शक्य नसल्यास घरात गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करू शकता. गंगेचे पाणी नसेल तर सर्व तीर्थे आणि नद्यांचे ध्यान करून स्नान करावे. त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे.
पौर्णिमेला हे शुभ कार्यही करा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.