आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदत्त जयंती आज:दत्तात्रेयांनी पृथ्वी,अजगरसहित बनवले होते 24 गुरु; प्रत्येक परिस्थितीत सारखेच राहण्याची शिकवण देते आकाश

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज श्रीदत्त जयंती आहे. भगवान दत्तात्रय ब्रह्मदेवाचे मानस पुत्र ऋषी अत्री यांचे पुत्र आहेत. यांच्या आईचे नाव अनुसया आहे. विविध ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे की, ऋषी अत्री आणि अनुसया यांना तीन पुत्र होते. ब्रह्मदेवाच्या अंशाने चंद्र, महादेवाच्या अंशाने दुर्वासा ऋषी आणि भगवान विष्णूच्या अंशाने दत्तात्रयांचा जन्म झाला. काही ग्रंथांमध्ये असाही उल्लेख आहे की, श्रीदत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे सम्मिलित अवतार आहेत. भगवान दत्तात्रय विविध कारणांमुळे प्रसिद्ध आहेत, परंतु एक विशेष कारण म्हणजे त्यांनी आपल्या जीवनात 24 गुरु केले होते. दत्तात्रयांच्या 24 गुरूंमध्ये मनुष्यासोबतच विविध पशु-पक्षी यांचाही सहभाग होता. या 24 गुरूंकडून आपणही यशस्वी जीवनाचे 24 सूत्र आत्मसात करू शकतो.

येथे जाणून घ्या, भगवान दत्तात्रयांचे 24 गुरु कोणकोणते आहेत आणि त्यांचे 24 सूत्र...

कबुतर - कबुतराची जोडी जाळ्यात अडकेलेल्या आपल्या पिलांना सोडवण्यासाठी स्वतः जाळ्यात अडकते. यांच्याकडून अशी शिकवण मिळते की, एखाद्याशी खूप जास्त स्नेह, प्रेम दुःखाचे कारण बनते.

पृथ्वी - सहनशील व परोपकाराची भावना शिकू शकता. लोक पृथ्वीवर विविध प्रकारचे आघात करतात परंतु पृथ्वी या आघातांना परोपकाराच्या भावनेने सहन करते.

पिंगला वेश्या- पिंगला नावाच्या वेश्येकडून दत्तात्रयांनी शिकवण घेतली की, केवळ पैशासाठी जगू नये. पिंगला केवळ पैशासाठी पुरुषांना आकर्षित करत होती. धन प्राप्तीच्या हव्यासामुळे तिला शांत झोपही लागत नव्हती. एके दिवशी जेव्हा पिंगलाच्या मनामध्ये वैराग्य जागृत झाले, तेव्हा तिला समजले की पैशामध्ये नाही तर परमात्म्याच्या ध्यानामध्येच खरे सुख आहे. त्यानंतर तिला शांत झोप लागली.

सूर्य - दत्तात्रेयांनी सूर्यामध्ये पाहिले की, तो वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होतो. आपला आत्मा देखील एक आहे, परंतु तो सूर्याप्रमाणे अनेक रूपात प्रकट होतो.

वायू - ज्याप्रमाणे चांगल्या-वाईट ठिकाणी प्रवाहित होऊनही हवेचे मूळ स्वरूप बदलत नाही, त्याचप्रमाणे आपण चांगल्या-वाईट लोकांसोबत असलो तरी आपले गुण सोडू नयेत.

हरीण - हरणाकडून शिकावे की, मौजमजा करण्यात आपण इतके बेफिकीर राहू नये की आपण अडचणीत येऊ. हरीण मौजमजेत इतके मग्न राहते की त्याला आजूबाजूला वाघ असल्याचेही लक्षात येत नाही.

समुद्र - समुद्राप्रमाणे आपणही चढ-उतारामुळे थांबू नये. आपण कोणत्याही परिस्थितीत पुढे जात राहिले पाहिजे.

पतंगा (फुलपाखरूसारखा किडा) - पतंगा आगीकडे आकर्षित होऊन जळून जातात. यातून आपण शिकले पाहिजे की आपण कधीही मोहात अडकू नये.

हत्ती - हत्तीचा हत्तीनीच्या संपर्कात येताच तिच्यावर मोहित होऊन सर्व काही विसरून जातो. संन्यासीने स्त्रियांपासून लांब राहावे, अन्यथा तो त्याच्या तपश्चर्येपासून दूर जाऊ शकतो हे हत्तीकडून शिकावे.

आकाश - आपण आकाशाकडून शिकू शकतो की, प्रत्येक परिस्थितीत एकसारखेच राहिले पाहिजे. देश, काळ, परिस्थिती कशीही असली तरी आकाश तेच राहते.

जल - दत्तात्रेयांनी पाण्यापासून शिकवण घेतली की, आपण नेहमी शुद्ध राहिले पाहिजे.

मध काढणारा - मधमाश्या मध गोळा करतात आणि एके दिवशी मध काढणारा येऊन सर्व मध घेऊन जातो. यातून हे शिकता येईल की, गरजेपेक्षा जास्त वस्तू गोळा करू नयेत, नाहीतर कोणीतरी त्या वस्तू आपल्याकडून घेऊन जाईल.

मासा - स्वादाचा लोभ ठेवू नका. काट्यात अडकलेल्या मांसाच्या तुकड्याच्या लोभापायी मासाच त्या काट्यात अडकतो.

सुतार पक्षी - सुतार पक्ष्याकडून शिकावे की, एखादी गोष्ट कायमस्वरूपी सोबत ठेवण्याचा विचार सोडून द्यावा. सुतार पक्षी मांसाचा तुकडा चोचीत धरतो, पण खात नाही. इतर बलवान पक्षी तो मांसाचा तुकडा हिसकावून घेतात.

मूल - लहान मुलाकडून शिका की परिस्थिती कशीही असो, नेहमी चिंतामुक्त आणि आनंदी राहावे.

आग - वेगवेगळ्या लाकडांमध्ये राहूनही आग सारखीच दिसते. परिस्थितीनुसार आपणही जुळवून घेतले पाहिजे.

चंद्र - चंद्राच्या कला वाढल्या आणि कमी झाल्या तरी त्याची चमक आणि शीतलता बदलत नाही, त्याच प्रकारे आपला आत्मा देखील बदलत नाही.

शरकृत, बाण तयार करणारा - दत्तात्रेयाने एका बाण बनवणाऱ्याला पाहिले, जो बाण बनवण्यात इतका मग्न होता की राजाची स्वारी त्याच्याजवळून पुढे गेली, पण त्याला ते कळलेही नाही. आपणही आपल्या कामात मग्न असले पाहिजे.

साप - कोणत्याही संन्यासीने एकट्याने जीवन जगले पाहिजे आणि जागोजागी ज्ञानाचा प्रसार करत राहिले पाहिजे हे दत्तात्रेयांनी सापाकडून शिकले.

स्पायडर - कोळी एक जाळे बनवतो, त्यात राहतो आणि शेवटी संपूर्ण जाळे स्वतःच गिळतो. भगवंतही आपल्या मायेने विश्व निर्माण करतो आणि शेवटी ते विश्व स्वतःमध्ये सामावून घेतात.

भृंगी कीटक - दत्तात्रेयाने या किड्याकडून शिकले की, चांगले असो वा वाईट, मन ज्या ठिकाणी लागेल विचारही तसेच होतात.

भुंगा किंवा मधमाशी - मधमाश्या आणि भुंगा वेगवेगळ्या फुलांचे परागकण घेतात, आपण जेथून सार्थक गोष्टी मिळतील त्या ग्रहण कराव्यात.

अजगर - अजगराकडून समाधानाने जगायला शिकले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...