आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देव प्रबोधिनी एकादशी 4 नोव्हेंबरला:सूर्यास्तानंतर तुळशीजवळ दिवा लावावा आणि या मंत्राचा जप करावा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 4 नोव्हेंबरला कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. असे मानले जाते की या तिथीला भगवान श्रीविष्णू विश्रांतीतून जागे होतात आणि सृष्टीचा भार स्वीकारतात. यालाच प्रबोधिनी किंवा देवउठनी एकादशी म्हणतात. या दिवशी तुळशीचा विवाह शाळीग्राम यांच्याशी केला जातो. प्रबोधिनी एकादशीपासून सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी शुभ मुहूर्त सुरू होतील.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिथीला तुळशी आणि शाळीग्रामचा विवाह करण्याची परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे. शाळीग्राम हे श्रीविष्णूचे स्वरूप मानले जातात.

तुळशीचा विवाह शंखचूड राक्षसाशी झाला होता
प्राचीन काळी तुळशीचा विवाह शंखचूड नावाच्या राक्षसाशी झाला होता अशी आख्यायिका आहे. शंखचूड हा देवांसाठी त्रासदायक ठरला होता. सर्व देवांना त्याचा पराभव करणे शक्य नव्हते. शंखचूडची दहशत संपवण्यासाठी सर्व देवांनी महादेवाची प्रार्थना केली. यानंतर शिव आणि शंखचूड यांच्यात युद्ध सुरू झाले. पुष्कळ प्रयत्न करूनही शिव राक्षसाचा अंत करू शकत नव्हते, कारण राक्षसासोबत तुळशीच्या सतीत्वतेची शक्ती होती.

त्यावेळी भगवान विष्णूंनी कपटाने तुळशीचे सतीत्व भंग केले. त्यानंतर तुळशीचा पती शंखचूडचा महादेवांनी वध केला. तुळशीला जेव्हा हे कळले तेव्हा तिने श्रीविष्णूला दगड होण्याचा शाप दिला. श्रीविष्णूने हा शाप स्वीकारला आणि तुळशीला पूजेचे वरदान दिले. तेव्हापासून श्रीविष्णूंची दगड स्वरूप शाळीग्रामची पूजा करण्यास सुरुवात झाली.

देव प्रबोधिनी एकादशीला असे करावे तुळशी पूजन
प्रबोधिनी एकादशीला सकाळी लवकर उठून घर आणि तुळशीभोवतीची जागा स्वच्छ करावी. स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे. हळद, दूध, कुंकू, अक्षता इ. पूजेचे साहित्य अर्पण करावे. नैवेद्य दाखवावे.

सूर्यास्तानंतर तुळशीजवळ दिवा लावावा. कापूर पेटवून आरती करावी. या दिवशी तुळशी आणि शाळीग्रामचे लग्न करणे शक्य नसल्यास तुळशीची सामान्य पूजा करावी.

घरात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी तुळशी देवीची प्रार्थना करावी. तुलसी नामाष्टक पठण करावे. तुलसी नामाष्टक म्हणजेच तुळशीची आठ नावे असलेल्या मंत्राचा जप करा.

मंत्र :
वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी। पुष्पसारा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी।।
एतभामांष्टक चैव स्त्रोतं नामर्थं संयुतम। यः पठेत तां च सम्पूज्य सौश्रमेघ फलंलमेता।।

बातम्या आणखी आहेत...