आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपोत्सव 13 पासून:धनत्रयोदशीला राशीनुसार करू शकता खरेदी, या तिथीला भगवान धन्वंतरी आणि यमदेवाची करावी पूजा

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी 13 नोव्हेंबरपासून दीपोत्सव सुरु होत आहे. 13 तारखेला धनत्रयोदशी आहे. यावेळी पंचाग भेदामुळे काही ठिकाणी 12 तारखेला धनत्रयोदशी सांगण्यात आली आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार धनत्रयोदशी तिथीला भगवान धन्वंतरी आणि यमदेवाची विशेष पूजा करण्याची प्रथा आहे. या तिथीला स्वतःच्या राशीनुसार खरेदी केली जाऊ शकते. प्राचीन काळी याच तिथीला समुद्र मंथनातून भवन धन्वंतरी प्रकट झाले होते. त्यांच्या हातामध्ये अमृत कलश होता. यांना आयुर्वेदाचे देवता मानले जाते. येथे जाणून घ्या, धनत्रयोदशीला राशीनुसार काय करावे आणि काय करू नये...

मेष -
या राशीच्या लोकांनी सोने, चांदी, भांडे, दागिने, हिरे, वस्त्र खरेदी करणे शुभ राहील. चमडा, केमिकल इ. गोष्टीही खरेदी करू नयेत.

वृषभ -
सोने, चांदी, पितळ, हिरे, कॉम्प्युटर, भांडे इ. वस्तुंची खरेदी शुभ राहील. केशर, चंदनाचीही खरेदी करू शकता. फर्टिलायझर्स, वाहन, तेल, चमडा आणि लाकडापासून तयार केलेल्या वस्तू खरेदी करू नयेत.

मिथुन -
या राशीच्या लोकांना जमीन, घर, प्लॉट इ. व्यवहारासाठी लाभकारी दिवस. पुष्कराज, सोने, चांदी इ. गोष्टी निश्चितपाने खरेदी करू शकता. कोणालाही कर्ज देऊ नये.

कर्क -
सोने, चांदी, भांडे, पितळ, वस्त्र, लोखंड व यापासून निर्मित वस्तू खरेदी करू शकता. मोठी गुंतवणूक आताच करू नका. ब्रँडेड सामानाच खरेदी करावे.

सिंह -
वाहन, वीज उपकरण, सोने, चांदी, पितळ, भांडे, लाकडाच्या वस्तू खरेदी करू शकता. लोखंड आणि सिमेंटपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्यापासून दूर राहावे. चांदी खरेदी लाभदायक राहील. बांधलेल्या घराचा सौदाही करू शकता.

कन्या -
किमती धातूंव्यतिरिक्त हिरे, नवीन वाहन खरेदी करू शकता. जमीन, घर, प्लॉट इ. गोष्टींमध्येही लाभ होईल. कर्ज घेऊन खरेदी करू नये.

तूळ -
सोने, तांब धातूपासून तयार केलेल्या वस्तू खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त सजावटी वस्तू खरेदी करण्यासाठी दिवस चांगला आहे. लोखंडाची वस्तू सोडून इतर कोणतेही वस्तू खरेदी करू शकता. या दिवशी तुम्ही वाहनही खरेदी करू शकता.

वृश्चिक -
सोने, चांदी, भांडे, पितळ, वस्त्र, लोखंड आणि यापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू शकता. गुंतवणुकीपासून दूर राहावे. लक्षात ठेवा, ब्रँडेड वस्तूच खरेदी कराव्यात.

धनु -
गुरु ग्रह याच राशीमध्ये आहे. तुम्हाला जमीन, स्थावर मालमत्ता यातून विशेष लाभ होऊ शकतो. मौल्यवान धातूपासूनही लाभ होऊ शकतो.

मकर -
तुमच्यासाठी हा काळ चांगला राहील. सर्व वस्तूंच्या खरेदीतून लाभ होऊ शकतो. वस्त्र आणि सोने खरे करणे शुभ राहील.

कुंभ -
या राशीच्या लोकांनी पुस्तक, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, लाकडी फर्निचर, घरात सजावटीचे सामान खरेदी करणे शुभ राहील.

मीन -
सोने-चांदी, रत्न, इ वस्तू खरेदीसाठी चांगले योग आहेत. शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी. वस्त्र आणि दागिने खरेदी करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...