आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनत्रयोदशी आज:प्रॉपर्टीपासून दागिन्यांच्या खरेदीसाठी वेगवेगळे मुहूर्त, त्रिपुष्कर योग गुंतवणुकीत तिप्पट लाभ देईल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनत्रयोदशीपासून पाच दिवसीय दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. सर्व प्रकारच्या खरेदी, गुंतवणूक आणि नवीन सुरुवात करण्यासाठी आजचा काळ शुभ असेल. त्रिपुष्कर योग जुळून आल्यामुळे तिप्पट लाभ मिळण्याचीही शक्यता आहे.

धनत्रयोदशीला सोने-चांदी आणि भांडी खरेदी करण्याचीही परंपरा आहे. या दिवशी सायंकाळी प्रदोषकाळात कुबेर आणि लक्ष्मीसह भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. अकाली मृत्यू टाळण्यासाठी आणि उत्तम आरोग्याची इच्छा करण्यासाठी घराबाहेर यमदेवासाठी दक्षिण दिशेला दिवा लावला जातो.

प्रॉपर्टी खरेदीसाठी शुभ मुहूर्त
सकाळी 7:55 ते दुपारी 1:10 पर्यंत
दुपारी 3:15 ते रात्री 8:05 पर्यंत

वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त
सकाळी 10:05 ते दुपारी 12:05 पर्यंत
दुपारी 1:30 ते 3:15 पर्यंत

ज्वेलरी आणि भांडी खरेदीसाठी
सकाळी 10:05 ते दुपारी 12:05 पर्यंत
दुपारी 4:40 ते रात्री 8:10 पर्यंत

सजावटीचे सामान, फर्निचर आणि कपडे खरेदीसाठी
सकाळी 10:05 ते दुपारी 1:50 पर्यंत
संध्याकाळी 6:20 ते रात्री 8:10 पर्यंत

इलेक्ट्रॉनिक सामान खरेदीसाठी
सकाळी 10:05 ते दुपारी 12:05 पर्यंत
दुपारी 4:45 ते रात्री 8:10 पर्यंत

तिप्पट लाभ देणारे योग
धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग तयार होत आहे. म्हणजेच या शुभ योगात केलेली गुंतवणूक, खरेदीचा सुरुवातीला तिप्पट लाभ मिळेल. हा सकाळी 6.35 ते दुपारी 12 पर्यंत असेल. मात्र खरेदीसाठी शुभ मुहूर्त असल्याने संपूर्ण दिवस खरेदीसाठी शुभ आहे. आज चंद्र स्वतःच्या नक्षत्रात आहे आणि गुरूची त्यावर दृष्टी आहे. ही स्थिती सुख, समृद्धी आणि शुभ परिणाम देईल.

सोने आणि भांडी खरेदी करण्याची परंपरा का
समुद्रमंथनानंतर भगवान धन्वंतरी हातात सोन्याचा कलश घेऊन प्रकट झाले. जे अमृताने भरलेले होते. त्यांच्या दुसऱ्या हातात औषधे होती आणि त्यांनी आयुर्वेदाचे ज्ञान दिले. यामुळेच या दिवशी आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते.

धन्वंतरीच्या हातात सोन्याचा कलश होता, त्यामुळे या दिवशी भांडी आणि सोने खरेदी करण्याची परंपरा सुरू झाली. नंतर आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन चांदी आणि इतर धातूंची खरेदी सुरु झाली. तेव्हापासून या दिवशी चांदीची नाणी, गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्ती आणि दागिन्यांची खरेदी कुटुंबात समृद्धी राहावी या इच्छेने केली जाते. पितळ, स्टील, तांब्याची भांडी खरेदी करण्याचीही परंपरा आहे.

समुद्रमंथनाचे फळ, धन्वंतरी...
देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले. त्यातून लक्ष्मी, चंद्र आणि अप्सरांनंतर त्रयोदशी तिथीला धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन बाहेर पडले, म्हणजेच या दिवशी समुद्रमंथनाचे फळ मिळाले. त्यामुळे येथूनच दिवाळी साजरी करणे सुरू झाले. वाल्मिकींनी रामायणात लिहिले आहे की भगवान विष्णु-लक्ष्मीचा विवाह अमावस्येला झाला होता. म्हणूनच दीपावलीला लक्ष्मीपूजन केले जाते.