आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 डिसेंबरपासून धनुर्मास सुरु होणार:सूर्य धनु राशीत आल्याने महिनाभर शुभकार्य होणार नाहीत

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

16 डिसेंबरपासून धनुर्मास सुरू होत आहे.यालाच खरमास असेही म्हणतात. या काळात शुभ कार्य होत नाहीत. यासोबतच एक महिना म्हणजे मकर संक्रांतीपर्यंत शुभकार्य होणार नाहीत. त्यामुळे लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, इ शुभकार्य होणार नाहीत. 14 जानेवारीपर्यंत म्हणजेच मकर संक्रांतीपर्यंत खरमास राहील.

पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र सांगतात की, 16 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सूर्य वृश्चिक राशीतून निघून धनु राशीत प्रवेश करेल. यासोबतच खरमासाची सुरुवात होणार आहे. एक महिना सूर्य धनु राशीत राहील. सूर्याच्या या राशी परिवर्तनाने धनु संक्रांतीची सुरुवात होईल. ज्याला धनुर्मास असेही म्हणतात.

सूर्य धनु राशीत आल्यानंतर त्यावर राहूची दृष्टी राहील. यासोबतच सूर्य-शनीचा द्विर्द्वादश अशुभ योगही तयार होईल. त्यामुळे अचानक ऋतू बदल होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हिमवृष्टी आणि पाऊसही होऊ शकतो. थंडीच्या मोसमामुळे थंडी आणखी वाढणार आहे. नक्षत्रांच्या अशुभ प्रभावामुळे अनेक लोकांच्या कामात अडथळे येऊ शकतात.

शुभ कार्यास प्रतिबंध
डॉ मिश्र यांच्यानुसार, धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार खरमास शुभ मानला जात नाही. म्हणूनच या काळात कोणतेही शुभकार्य करण्यास मनाई आहे. या काळात हिंदू धर्मात सांगितलेले सर्व शुभ विधी केले जात नाहीत. यामध्ये विशेषत: मुंडन, विवाह, साखरपुडा, यज्ञ, नामकरण, गृहप्रवेश, गृहनिर्माण आणि वधूप्रवेश यासह इतर शुभ कार्यांचा समावेश होतो.

मकर संक्रांतीला खरमास संपेल
16 डिसेंबरपासून सुरू होणारा खरमास 2023 च्या पहिल्या महिन्यात 14 जानेवारीपर्यंत असेल. पंचांगानुसार जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत येते. यावेळी खरमास संपतो. 14 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. यासोबतच खरमास संपणार आहे.

बातम्या आणखी आहेत...