आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल आषाढी कीर्तन सोहळा:पाहा, ह.भ.प भारत महाराज कोकाटे यांचे कीर्तन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद शहरातील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात विद्यार्थ्यांना घडविताना राज्यभर कीर्तन,प्रवचन सेवेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा विचार देत आहेत. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातल्या दासखेड येथील कोकाटे महाराज 25 वर्षांपूर्वी उस्मानाबाद शहरात हभप वसंतराव नागदे यांच्या सान्निध्यात आले. शहरात भव्य ज्ञानेश्वर मंदिराची उभारणी झाली आणि महाराज या मंदिरात गुरुजी म्हणून रुजू झाले. त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना पखवाज,भजन,कीर्तनाचे धडे दिले आहेत.

उस्मानाबादच्या या मंदिरात वर्षातून सुमारे तीनवेळा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. शहरातील भाविकांसाठी ही पर्वणीच असते. सुमारे 25 वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. राज्यभरातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी आपली सेवा बजावतात. या सप्ताहाचे नियोजन कोकाटे महाराजांकडे असते. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनलेल्या या मंदिरात पहाटेपासून रात्रीपर्यंत सतत धार्मिक कार्यक्रम असतात. कोकाटे महाराजांना मानणारा मोठा भक्त वर्ग महाराष्ट्रात आहे.

बातम्या आणखी आहेत...