आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिजिटल आषाढी कीर्तन सोहळा:पाहा, नाशिकचे ऍड. ह.भ.प. भाऊसाहेब हरी गंभीरे महाराज यांचे कीर्तन 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ह.भ.प. भाऊसाहेब हरी गंभीरे महाराज यांचे मुळगाव धारणगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे आहे.

घराण्यात वारकऱ्यांची परंपरा तसेच लहानपणापासूनच महाराजांना सामाजिककार्य कीर्तन प्रवचन व अध्यात्माची आवड होती. श्रीक्षेत्र आळंदी येथे दोन वर्षाचा निवासी किर्तन कोविद अभ्यासक्रम केला. नंतर राज्यभरात किर्तन प्रवचनांचे कार्यक्रम केले. राज्याबाहेरही श्रीक्षेत्र काशी रामेश्वरम बद्रीनाथ कुरुक्षेत्र द्वारका यासह अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे.

पुणे विद्यापीठातून विधी शाखेचे शिक्षण घेऊन पदवी प्राप्त केली असून समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी, पत्रकारितेची पदवी अशा अनेक क्षेत्रातील शिक्षण घेतल्यानंतर नाशिक येथे धर्मादाय विभागातील सल्लागार म्हणून कामकाज राज्यभरातील ट्रस्टचे सल्लागार आहेत.

अध्यात्म संत साहित्याचे अभ्यासक

सामाजिक जनजागरण यासाठी राज्यभरात लोक कलेचे कार्यक्रम केले आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये  युवकांना अध्यात्माची गोडी लावण्यासाठी व्याख्याने दिली आहेत.

बातम्या आणखी आहेत...