आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल आषाढी कीर्तन सोहळा:पाहा, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांचे कीर्तन 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील डीकसळ येथील श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराज गुरू घराण्याचे वंशज. बोधले महाराज अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, त्यांनी दोन वर्षांपूर्वी दिल्लीत हजारोवर भाविकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला होता. देवाची आळंदी येथे अभूतपूर्व पारायण सोहळ्यानंतर त्यांचे देशभर कौतुक झाले होते. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सामाजिक विषयावर जनजागृती करत असतानाच वारकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी सरकारदरबारी मांडले आहेत. त्यांच्या गादी घराण्याला मानणारा मोठा समुदाय देशात असून,दरवर्षी त्यांच्या गावी सोहळा पार पडतो.वारकरी संप्रदायाचा प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी गावात वारकरी शिक्षण संस्था सुरू केली आहे. या संस्थेत विद्यार्थी अध्यात्मासोबतच शालेय शिक्षण घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...