आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शक्तिरूपी कामाक्षी दर्शन:येथे माता कामाक्षी 8 वर्षांच्या कन्येच्या रूपात विराजित, आज दिवाळीला घरोघरी जाऊन भक्तांना देणार दर्शन

कांचीपुरम : मनीषा भल्ला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिराचा मुख्य घुमट 76 किलो सोन्याचा, माता कामाक्षीकडे 1 हजार कोटींचे मौल्यवान दागिने
  • राजा दशरथाने अपत्यप्राप्तीसाठी केली होती माता कामाक्षीची पूजा

मंदिरांचे शहर कांचीपुरममध्ये श्री कांची कामाक्षी अम्मन मंदिरात दिवाळी उत्सव खूप विशेष असतो. रोषणाई, शंखनाद, फुलांचा सुवास, नादस्वरमचे सूर मंत्रांचे उच्चारण यामुळे वातावरण देवलोकासारखे भासते. हे एकमेव शक्तिपीठ आहे, जेथे कामाक्षीच्या एका डोळ्यात लक्ष्मीचा आणि दुसऱ्यात सरस्वतीचा वास आहे. एका मूर्तीची पूजा लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा या रूपात केली जाते. आदी शंकराचार्यांनी स्थापन केलेले श्रीचक्र फक्त येथेच आहे. मंदिराचे प्रमुख श्रीकार्यम शास्त्री चेल्ला विश्वनाथ सांगतात की, अयोध्येचे राजे दशरथ हे महर्षी वसिष्ठांच्या सांगण्यावरून संतानप्राप्तीसाठी कामाक्षीची पूजा करण्यासाठी येथे आले होते. येथील २४ स्तंभांपैकी एकाची पूजा करताना त्यांना,‘ एक वर्षाच्या आत तुम्हाला अपत्यप्राती होईल,’ अशी आकाशवाणी ऐकू आली होती. आजही या स्तंभाची संतान स्तंभ म्हणून पूजा केली जाते.

दिवाळीची येथील परंपरा इतर लक्ष्मी मंदिरांपेक्षा वेगळी आहे. परंपरेनुसार एखाद्याचे आई-वडील अथवा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर तो वर्षभर कामाक्षीच्या दर्शनाला येऊ शकत नाही. त्यामुळे दिवाळीनिमित्त कामाक्षीची पालखी प्रत्येक गल्लीतून जाते. मातेच्या दर्शनासाठी लोक घराबाहेर उभे असतात. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने सांगितले की, मातेकडे १००० कोटींचे मौल्यवान दागिने आहेत. पूजेला वापरल्या जाणाऱ्या माळाही केशर, बदाम, काजू, कमळ, चमेली, गुलाबाच्या असतात. १५ ते २० किलोच्या या माळा ५ लाख रुपयांत तयार होतात. मंदिराचे वैभव अलौकिक आहे. मंदिराचा मुख्य घुमट ७६ किलो सोन्याचा आहे. नवरात्री आणि इतर उत्सवाच्या वेळी ज्या रथावर कामाक्षी आरूढ होते तो २० किलो सोन्यापासून बनवलेला आहे. दरवर्षी भक्त मंदिरात ५ कोटी रुपये देणगी म्हणून देतात. दररोज सुमारे दहा हजार भाविक येतात. कामाक्षीचे हे रूप आठवर्षीय कन्येचे रूप आहे. अविवाहित पुजारी मूर्तीला स्पर्श करू शकत नाहीत. येथे फक्त विश्वामित्र आणि भारद्वाज गोत्रातील पंडितांनाच पूजा करण्याचा हक्क आहे. त्यांचेच वंशज शेकडो वर्षांपासून येथे पूजा करत आलेले आहेत. येथील पूजा महर्षी दूर्वास यांनी लिहिलेल्या ‘सौभाग्यचिंतामणि’ या ग्रंथानुसार केली जाते.

कामाक्षी मंदिराच्या गर्भगृहातच आहे आदी शंकराचार्य यांनी स्थापन केलेले श्रीचक्र
माता कामाक्षीच्या मूळ मूर्तीसमोर श्रीचक्र आहे, ते आदी शंकराचार्य यांनी स्थापन केले आहे. हा पूजाअर्चेचा तांत्रिक विधी आहे. शास्त्री रामानंद यांनी, त्याला देवीच्या घराची ब्ल्यूप्रिंट म्हणता येईल, असे सांगितले. श्रीचक्रात खालच्या बाजूला मुख असलेले पाच त्रिकोण आणि चार वरच्या दिशेला मुख असलेले त्रिकोण आहेत. त्यात ४४ कोन आहेत. त्यात फुलांच्या पाकळ्या आणि नऊ स्तर आहेत. मध्यबिंदूवर कामाक्षी विराजमान आहे. त्याला देवीचे सूक्ष्म शरीर म्हटले जाते. त्याची पूजा भाविकांसमोर होत नाही. नवरात्र, ब्रह्मोत्सव आणि पौर्णिमेला होणाऱ्या नवआवरण पूजेत फक्त पुजारीच असतात.

कुंकू वाहून केली जाते लक्ष्मी रूपातील पूजा
माता लक्ष्मीची पूजा कुंकू वाहून केले जाणारे हे एकमेव मंदिर. त्यामागील मान्यता अशी आहे की, वादामुळे विष्णूंनी लक्ष्मीला कुरूप होण्याचा शाप दिला होता. माता कामाक्षीची पूजा करून लक्ष्मीने शापापासून मुक्ती मिळवली होती. आपण लक्ष्मीसोबत येथे राहू, असे माता कामाक्षीने तेव्हा म्हटले होते. माझ्या प्रसादानेच लक्ष्मीचीही पूजा होईल, पण लक्ष्मीला येथे येणाऱ्यांची इच्छा पूर्ण करावी लागेल. कामाक्षीला जे कुंकू वाहिले जाते, ते लक्ष्मीलाही वाहिले जाते.

बातम्या आणखी आहेत...