आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी आज:लक्ष्मी पूजनासाठी दिवसभर राहतील 5 शुभ मुहूर्त; जाणून घ्या पूजेचा सोपा विधी आणि मंत्रोच्चार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज गुरुवार 4 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी पूजन आणि दिवाळी सण साजरा होणार आहे. भागवत आणि विष्णुधर्मोत्तर पुराणानुसार, कार्तिक महिन्याच्या अमावास्येला समुद्रमंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाली. यासोबतच वाल्मिकी रामायणात असे लिहिले आहे की, या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचा विवाह झाला होता. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजनाची परंपरा आहे. स्कंद आणि पद्मपुराणात सांगितले आहे की, या दिवशी दीप दान करावे, यामुळे पाप नष्ट होतात.

दिवाळीला दिव्यांची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या आधी कलश, गणेश, विष्णू, इंद्र, कुबेर आणि देवी सरस्वती यांची पूजा करण्याची परंपरा आहे. यंदा दिवाळीत तूळ राशीत चार ग्रह असल्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत असल्याचे ज्योतिषी सांगतात. या दिवशी केलेल्या उपासनेचे शुभ परिणाम लवकर प्राप्त होतात.

लक्ष्मीपूजनाची सहज- साेपी पद्धत..
लक्ष्मी आणि गणेशाला चाैरंगावर ठेवा. देवीसमाेर नाणी, राेख रक्कम, हिशाेब वही, नाेंदवही ठेवा. देवीला धणे, गूळ, बत्तासे, लाह्यांचा नैवेद्य शुभ मानला जाताे. लक्ष्मीसाेबत सरस्वती आणि कुबेरही असतात.

पूजा पद्धत : हा मंत्र म्हणताना स्वत:च्या अंगावर, आसन आणि पूजा साहित्यावर पळी किंवा फुलातून ३-३ वेळा पाणी शिंपडून शुद्ध करा.
ॐ अपवित्र: पवित्रोवा सर्वावस्थां गतोऽपिवा। य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाहान्तर: शुचि:॥

हा मंत्र म्हणताना आचमन करून हात धुवा..
ॐ केशवाय नम:, ॐ माधवाय नम:, ॐ नारायणाय नम:

पुन्हा आसन शुद्ध मंत्र म्हणा -ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुनाधृता। त्वं च धारयमां देवि पवित्रं कुरु चासनम्॥

अनामिका बाेटाने गंध लावताना हा मंत्र म्हणा
‘चन्दनस्य महत्पुण्यम् पवित्रं पापनाशनम्, आपदां हरते नित्यम् लक्ष्मी तिष्ठतु सर्वदा।’

कलश पूजन
कलशात नाणी, सुपारी, दूर्वा, अक्षता, तुळस आणि पाणी भरा. कलशावर आंब्याची पाने ठेवा. नारळाला वस्त्रात लपटेून कलशावर ठेवा.

हातात अक्षता, फुले घेऊन वरुण देवतेचा आवाहन मंत्र म्हणा -
आगच्छ भगवान देव स्थाने चात्र स्थिरो भव। यावत् पूजा सामग्री तावत्वं सुस्थीरो भव।।

श्री गणेश पूजा
या मंत्राने आधी गणेशाची पूजा करा
गजाननम्भूतगणादिसेवितं कपित्थ जम्बू फलचारुभक्षणम्। उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपंकजम्।।

हातात अक्षता घेऊन आवाहन मंत्राचा जप करा-
ॐँ गं गणपतये इहागच्छ इह तिष्ठ।।
ताम्हणात अक्षता साेडा. गणपतीला नैवेद्य दाखवा. पान, सुपारी, फूल वाहा. कलश पूजेनंतर कुबेर, इंद्रासह सर्व देवी- देवतांचे स्मरण करा.

लक्ष्मीपूजन विधी मंत्र
लक्ष्मी मातेचे ध्यान करा व मूळ मंत्र म्हणा
ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ ।।

आता हातात अक्षता घेऊन हा मंत्र म्हणा
ॐ भूर्भुवः स्वः महालक्ष्मी, इहागच्छ इह तिष्ठ, एतानि पाद्याद्याचमनीय-स्नानीयं, पुनराचमनीयम्।

स्नान घाला आणि वस्त्र अर्पण करा. प्रतिष्ठापनेनंतर गंध लावा. फुले, हार घाला. दूध, साखर ,सुकामेव्याचा नैवेद्य दाखवा. इदं रक्त वस्त्र समर्पयामी असे म्हणून लाल रंगाचे वस्त्र अर्पण करा . लक्ष्मीला प्रसाद दाखवा. लक्ष्मी श्रीसूक्तच्या १६ मंत्रांचे पठण करा.

माता सरस्वतीचे ध्यान करून हा मूळ मंत्र म्हणा
ॐ ब्रह्म पत्नीच विद् महे महावाण्यैचधीमहि तन्न: सरस्वती प्रचोदयात्।।
आता फुले वाहून मंत्र म्हणा :एष: पुष्पांजलि ॐ महालक्ष्मियै नम:लक्ष्मी

पूजनानंतर भगवान विष्णूचे स्मरण करा.
ॐ नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च, जगद्धिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः।

आता पूजेनंतर क्षमाप्रार्थना म्हणून आरती करा.

बातम्या आणखी आहेत...