आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपोत्सवाचा पहिला दिवस:धनत्रयोदशी 13 ला, या दिवशी यमदेवाला दीपदान केल्याने नष्ट होते अकाल मृत्यूचे भय

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनत्रयोदशी सण यावर्षी 13 नोव्हेंबरला आहे. या दिवशी खरेदी करण्याची प्रथा आहे. मान्यतेनुसार या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंचा क्षय होत नाही. खरेदी व्यतिरिक्त या दिवशी यम-दीपदान अवश्य करावे. स्कंद पुराणानुसार या दिवशी असे केल्याने अकाल मृत्यूचे भय दूर होते. संपूर्ण वर्षभरात धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशी तिथीला मृत्यूचे देवता यमदेवाची पूजा दीपदान करून केली जाते.

या दिवशी संध्याकाळी यमदेवासाठी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावला जातो. मान्यतेनुसार असे केल्याने त्या घरात राहणाऱ्या लोकांवर यमदेव प्रसन्न होतात आणि कुटुंबातील सदस्यांना अकाल मृत्यूची भीती राहत नाही.