दुर्गा पूजा 25 पासून / कोरोनाव्हायरसमुळे चैत्र नवरात्रीत मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरातच करा शुभ काम आणि देवी पूजा

  • चैत्र नवरात्रीमध्ये घरातच कोणकोणती शुभ कामे केली जाऊ शकतात...

दिव्य मराठी

Mar 24,2020 12:10:00 AM IST

बुधवार, 25 मार्चपासून हिंदू नवीन संवत 2077 सुरु होत आहे. यासोबतच चैत्र मासातील नवरात्री सुरु होईल. गुरुवार 2 एप्रिलला रामनवमीपर्यंत नवरात्री राहील. या काळात देवी दुर्गा पूजा करण्याची तसेच देवी मंदिरात दर्शनाची परंपरा आहे. परंतु यावेळी कोरोनाव्हायरसमुळे घराबाहेर पडू नये. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, दर्शन करण्यासाठी मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरातच देवी पूजा करावी. येथे जाणून घ्या, चैत्र नवरात्रीमध्ये घरातच कोणकोणती शुभ कामे केली जाऊ शकतात...

चैत्र नवरात्रीशी संबंधित मान्यता

पं. शर्मा यांच्यानुसार चैत्र नवरात्रीला देवी दुर्गा प्रकट झाली होती. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली होती. याच दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो.


सकाळी उठताच घ्यावे तळहाताचे दर्शन

रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वात पहिले हातांचे दर्शन घ्यावे. यालाच करदर्शन असे म्हणतात. या दरम्यान खालील मंत्राचा उच्चार करावा.

कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती।

करमूले तू गोविन्दः प्रभाते करदर्शनम्॥


सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे

स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. ऊँ सूर्याय नम: मंत्राचा जप करावा. अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करावा.


देघरात करावी पूजा

चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा पूजेपूर्वी श्रीगणेशाची पूजा करावी. श्रीगणेश प्रथम पूज्य देवता आहेत. यामुळे प्रत्येक शुभ कामाच्या सुरुवातीला श्रीगणेशाची पूजा केली जाते.


नवमीला करावे कुमारिका पूजन

नवमी म्हणजेच 2 एप्रिलला लहान मुलींची पूजा करावी. कुमारिकांना घरी बोलावून जेवू घालावे. त्यानंतर दक्षिणा आणि भेटवस्तू द्यावी. लहान मुलींना देवीचे स्वरूप मानले जाते. याच कारणामुळे नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन प्रथा प्रचलित आहे.

X