आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज मार्गशीर्ष आणि खरमासातील द्वादशी:या तिथीला श्रीविष्णूची नारायण रुपात पूजा केल्याने मिळते महायज्ञाचे पुण्य

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज मार्गशीर्ष महिन्याची द्वादशी तिथी आहे. या पवित्र महिन्यातील कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील द्वादशीला भगवान श्रीविष्णूची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी भगवान श्रीविष्णूच्या नारायण रूपाची पूजा करण्याचा नियम शास्त्रात सांगितला आहे. असे केल्याने मोठा यज्ञ करण्याइतके पुण्य मिळते. भगवान विष्णूच्या उपासनेसाठी विशेष दिवस असल्याने, श्रीकृष्णाने या तिथीला उत्सव म्हटले आहे.

द्वादशी तिथीचे महत्त्व
पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्र सांगतात की, प्रत्येक द्वादशीला भगवान श्रीविष्णूची पूजा करण्याचे महत्त्व धर्मग्रंथात सांगण्यात आले आहे. या तिथीला भगवान श्रीविष्णूची 12 नावांनी पूजा करावी. यासोबतच ब्राह्मण आणि गरजू लोकांना अन्नदान करावे. असे केल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होऊन अनंत पुण्य प्राप्त होते. पुराणानुसार या तिथीच्या शुभ प्रभावाने सुख-समृद्धी वाढते आणि मोक्ष प्राप्त होतो.

मार्गशीर्ष आणि खरमासात विष्णूपूजेचा योग
डॉ. मिश्र यांच्यानुसार, मार्गशीर्ष आणि खर महिन्यात भगवान श्रीविष्णूच्या नारायण रूपाची पूजा करण्याचा नियम आहे. विष्णुधर्मोत्तर पुराणातही याचा उल्लेख आहे. या दोन महिन्यांच्या एकादशी आणि द्वादशी तिथींना तीर्थाच्या पाण्यात तीळ मिसळून स्नान करावे. त्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे. यानंतर भगवान श्रीविष्णूची पूजा करून दिवसभर उपवास करून गरजू लोकांना दान केल्याने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात.

दुधाने अभिषेक करून तुळशीची पाने अर्पण करावीत
महाभारताच्या स्कंद पुराणात आणि अश्वमेधिक पर्वामध्ये प्रत्येक महिन्याच्या द्वादशी तिथीला भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाच्या मूर्तीला शंखामध्ये दूध आणि गंगेचे पाणी मिसळून अभिषेक करावा असे सांगितले आहे. यानंतर पूजा साहित्य आणि तुळशीची पाने अर्पण करावीत.

भगवान श्रीविष्णूला पूजेत ऋतुफळ (हंगामी फळ) अर्पण करावे. यानंतर नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. त्यानंतर गरजू लोकांना अन्नदान करावे. असे केल्याने कळत-नकळत झालेल्या सर्व प्रकारची पापे व दोष नष्ट होतात.

बातम्या आणखी आहेत...