आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरक कथा:सहज प्रतिक्रिया योग्य मार्ग दाखवतात. खोट्याचा आधार घेतल्याने गोष्टी बिघडतात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खोट्या गोष्टींचा आधार घेतल्याने गुंतागुंत वाढते

तीन साधू ज्ञानाच्या शोधात हिमालयात जातात. वाटेत लोकांनी दिलेले अन्न खातात. एकदा त्यांच्याकडे दोनच भाकरी शिल्लक राहतात. त्या वेळी स्वप्नात देव ज्याला भाकरी खाण्याचे संकेत देईल तोच भाकरी खाईल, असे ठरवतात. मध्यरात्री तिघेही एकमेकांना आपले स्वप्न सांगू लागतात.

पहिले साधू म्हणतात, ‘देव मला म्हणाला, ‘तू आयुष्यभर त्याग केला आहेस, त्यामुळे ही भाकरी तुझी आहे.’ दुसऱ्या साधूने आपले स्वप्न सांगितले, ‘देव म्हणाले, कठीण तपश्चर्या केल्यामुळे तू सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेस, त्यामुळे भाकरीवर तुझा अधिकार आहे.’ आता तिसऱ्या साधूची वेळ होती. ते म्हणाले, ‘माझ्या स्वप्नात ना देव आला, ना त्याने मला भाकरी खायला सांगितली. मध्यरात्री भुकेने जाग आली व मी भाकरी खाल्ली.’ दोन्ही साधू ओरडतात, ‘आम्हाला का सांगितले नाहीस?’ ‘कसे सांगणार? तुम्ही गाढ झोपेत देवाच्या साक्षात्कारात व्यग्र होतात. देवाने तीव्र भुकेचा अनुभव करून दिला व मला जाग आली. भाकरी खाण्यास इतकाच इशारा पुरेसा होता.’

तात्पर्य : सहज प्रतिक्रिया योग्य मार्ग दाखवतात. खोट्याचा आधार घेतल्याने गोष्टी बिघडतात.