आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिजरी संवतातील शव्वाल महिन्यातील शेवटचा रोजा सोमवारी झाला आणि चंद्रही दिसला. त्यामुळे आज ईद उल फितर साजरी होणार आहे. आज अक्षय्य तृतीया आणि ईद हे दोन्ही सण एकत्र साजरे केले जात आहेत. असाच योग गेल्या वर्षीही जुळून आला होता.
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला दान देण्याचे विशेष महत्त्व आहे. त्याच वेळी ईदच्या निमित्ताने, जकात अर्थात दान देण्याची प्रथा देखील आहे. जी गरिबांसाठी काढणे धार्मिक श्रद्धांमध्ये मोठे कर्तव्य असल्याचे म्हटले जाते. तसेच, सर्वांच्या कल्याणासाठी आणि शांतीसाठी यावेळी मशिदींमध्ये नमाज अदा केली जाते.
जकात: वार्षिक बचतीच्या काही भागाचे दान
कुराणमध्ये जकात-अल-फित्र आवश्यक सांगण्यात आले आहे. जकात म्हणजेच दान हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य असल्याचे सांगितले आहे. गरिबांना दिलेली ही देणगी आहे. पारंपारिकपणे, हे रमजानच्या शेवटी आणि लोक ईदच्या नमाजासाठी जाण्यापूर्वी दिले जाते.
मुस्लिम लोक आपली संपत्ती पवित्र करण्याच्या स्वरूपात वार्षिक बचतीचा एक भाग कर म्हणून गरजू लोकांना देतात. जगातील काही मुस्लिम देशांमध्ये जकात ऐच्छिक आहे, तर इतर देशांमध्ये ती अनिवार्य आहे.
आधी नमाज अदा केली जाते
ईद-उल-फितरच्या दिवशी, मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून मशिदींमध्ये नमाज अदा करतात आणि रमजानमध्ये रोजा ठेवण्याची शक्ती दिल्याबद्दल देवाचे आभार मानतात. यासोबतच पवित्रता, साधेपणा, माणुसकी आणि इतरांना मदत करण्याची तळमळ, श्रद्धेवर चालण्याचे बळ मिळावे. सर्वांच्या कल्याणासाठी आणि शांतीसाठी यावेळी मशिदींमध्ये प्रार्थना केली जाते.
मदिना येथे ईद-उल-फितर सुरू
मक्का येथून मोहम्मद पैगंबर यांच्या प्रवासानंतर पवित्र शहर मदिना येथे ईद-उल-फितर साजरा करण्यास सुरुवात झाली. पैगंबर हजरत मोहम्मद यांनी बद्रची लढाई जिंकली होती. या विजयाच्या आनंदात सर्वांची तोंडे गोड करण्यात आले. त्यामुळे हा दिवस मिठी ईद किंवा ईद-उल-फितर म्हणून साजरा केला जातो. ईद-उल-फितर 624 मध्ये प्रथमच साजरी करण्यात होती.
पैगंबर हजरत मुहम्मद साहब यांनी सांगितले आहे की, अल्लाहने सण साजरा करण्यासाठी कुराणमध्ये 2 पवित्र दिवस आधीच नमूद केले आहेत. ज्याला ईद-उल-फितर आणि ईद-उल-जुहा असे संबोधले जाते. अशा प्रकारे ईद साजरी करण्याची परंपरा सुरू झाली.
दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी मिठी ईद साजरी केली जाते
ईद-उल-फितरला मिठी ईद असेही म्हणतात. मुस्लिम बांधवांचा हा पवित्र सण आहे, जो भारतासह जगभरात साजरा केला जातो. इस्लामिक कॅलेंडरनुसार, रमजाननंतर, ईद-उल-फितर 10 व्या शव्वालला म्हणजेच इस्लामिक कॅलेंडरच्या दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते. चंद्र पाहून ईदची तारीख ठरवली जाते. यावर्षी 2 मे रोजी चंद्रदर्शन झाल्यामुळे आज हा दिवस साजरा केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.