आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रीचा आठवा दिवस:देवी महागौरीची पूजा केल्याने वाढते सकारात्मक ऊर्जा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. श्री महागौरी हे आदिशक्ती श्री दुर्गेचे आठवे रूप आहे. देवी महागौरीचा रंग अतिशय गोरा आहे, म्हणून तिला महागौरी म्हणून ओळखले जाते. मान्यतेनुसार देवीने तिच्या कठोर तपश्चर्येने गौर वर्णाची प्राप्ती केली होती. तेव्हापासून तिला उज्ज्वला स्वरूपा महागौरी, धन ऐश्वर्या प्रदायिनी, चैतन्यमाई त्रैलोक्य पूज्य मंगला, शारीरिक, मानसिक आणि सांसारिक त्रास दूर करणारी माता महागौरी अशी नावे देण्यात आली.

देवीचे स्वरूप
देवी महागौरी ही देवी दुर्गेची आठवी शक्ती आहे. देवीचे स्वरूप अत्यंत सौम्य आहे. देवी गौरीचे हे रूप अतिशय सुंदर, सुलभ आणि मोहक आहे. त्यांचे वस्त्र, दागिनेही पांढरे असतात. देवीला चार भुजा (हात) आहेत. महागौरीचे वाहन बैल आहे. देवीने वरच्या उजव्या हातात अभय मुद्रा आणि खालच्या हातात त्रिशूळ धारण केले आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या हातात वर मुद्रा आहे. त्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे.

उपासनेचे महत्त्व
नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केल्याने सर्व पाप धुऊन जातात. ज्याने मन आणि शरीर सर्व प्रकारे शुद्ध होते. महागौरी देवी भक्तांना सकारत्मक मार्गाच्या दिशेने घेऊन जाते. अपवित्र आणि अनैतिक विचारही त्यांची पूजा केल्याने नष्ट होतात. दुर्गा मातेच्या या सौम्य रूपाची पूजा केल्याने मनाची पवित्रता वाढते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जाही वाढू लागते. महागौरीची उपासना केल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते. त्याची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात.

स्तुती मंत्र
श्वेत वृषे समारूढ़ा श्वेताम्बरधरा शुचि:।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा॥

कथा
देवी पार्वतीच्या रूपात महागौरीने भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. एकदा भगवान भोलेनाथांच्या एका शब्दाने पार्वतीजींचे मन दुखावले जाते आणि देवी पार्वती तपश्चर्येत गढून जातात. अशा प्रकारे वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या करूनही देवी पार्वती येत नाहीत, तेव्हा भगवान शिव पार्वतीच्या शोधात देवीपर्यंत पोहोचतात. तिथे पोहोचल्यावर देवी पार्वतीला पाहून त्यांना आश्चर्य वाटते. देवी पार्वतीचा रंग अतिशय तेजस्वी तसेच चंद्रप्रकाशासारखा पांढरा आणि कुंद फुलासारखा पांढरा दिसतो. देवीच्या वस्त्र आणि अलंकारांवर प्रसन्न होऊन महादेव देवी उमाला गौरवर्णाचे वरदान देतात आणि यामुळे देवीला 'महागौरी' म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...