आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकादशी 3 आणि 4 डिसेंबरला:तिथी दोन दिवस पण उपवास आणि पूजा रविवारी करावी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. यावेळी एकादशी तिथी 3 आणि 4 डिसेंबरला असेल. परंतु विद्वानांच्या मते उपवास आणि पूजा 4 तारखेला करावी. महाभारत, नारद आणि भविष्य पुराणात सांगितले आहे की, या एकादशीचे व्रत आणि उपासना केल्याने कळत-नकळत केलेली पापे नष्ट होतात. यासोबतच मनातील इच्छाही पूर्ण होतात.

एकादशी तिथी कधी पासून कधी पर्यंत
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी शनिवार, 3 डिसेंबर रोजी सूर्योदयानंतर म्हणजेच सकाळी 8.10 वाजता सुरू होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 4 डिसेंबरला रविवारी सूर्योदयानंतर ते सुमारे 7 वाजून 8 मिनिटांपर्यंत राहील. पुरीचे ज्योतिषी डॉ.गणेश मिश्रा आणि काशीचे प्रा. रामनारायण द्विवेदी सांगतात की, जेव्हा एकादशी तिथी सूर्योदयाला दोन दिवस राहते, तेव्हा दुसऱ्या दिवशी ही व्रत-पूजा आणि स्नान-दान करावे.

मोक्ष देणारी एकादशी
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत केल्यास पापांचे नाश होऊन पितरांनाही मोक्ष प्राप्त होतो, अशी पौराणिक मान्यता आहे. म्हणूनच हे व्रत मोक्ष देणारे मानले जाते. हे व्रत केल्याने जे पुण्य मिळते ते अनेक यज्ञ करण्यासारखे आहे.

गीता जयंती उत्सव
द्वापार युगात महाभारत चालू होते. तेव्हा युद्धाच्या वेळी अर्जुनाला गीतेचा उपदेश करण्यात आला, त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी होती, त्यामुळे या व्रताचे महत्त्व अधिकच वाढते. या दिवशी प्रथमच भगवंताच्या मुखातून गीतेचे ज्ञान बाहेर पडले. म्हणूनच याला गीता जयंती असेही म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...