आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टींशी जुळण्याचा भाव कुठे न कुठे तरी असतो. शास्त्रामध्ये मन, वचन आणि कर्माशी संबंधित विविध पाप-पुण्य सांगण्यात आले आहेत. याची माहिती प्रत्येक व्यक्तीला माहिती असेल असे नाही. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या 8 गोष्टींचा अवलंब केल्यास जीवन आनंदी राहते.
हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...
प्राणाघातान्निवृति: परधनहणे संयम: सत्यवाक्यं
काले शक्तया प्रदानं युवतिजनकथामूकभाव: परेषाम्।
तृष्णास्त्रोतोविभंगो गुरुषु च विनय: सर्वभूतानुकम्पा
सामान्य: सर्वशास्त्रेष्वनुपहतविधि: श्रेयसामेष पन्था:।।
सोप्या शब्दांत सांगायचे तर मानवाने मन, वचन आणि व्यवहारात पुढील आठ गोष्टी आचरणात आणाव्यात...
- सत्य बोलणे.
- यथाशक्ती दान करणे.
- गुरूप्रती सन्मान आणि नम्रता. गुण, वय किंवा अन्य बाबतीत आपल्यापेक्षा मोठा असलेल्याचा मान राखणे.
- सर्वांप्रती दयाभाव.
- मनात निर्माण होणा-या इच्छांवर संयम ठेवणे.
- परस्त्रीबद्दल बोलणे किंवा ऐकणे टाळावे.
- दुस-यांची धनसंपत्ती हडपण्याचा विचार न करणे.
- प्राण्यांच्या प्रती अहिंसा भाव.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.