आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकारात्मक:अध्यात्म व विज्ञानावरील विश्वासाने मिळेल विजय

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मानवतेची शक्ती, अध्यात्माबद्दल आस्था व विज्ञानावर विश्वास आपल्याला जिंकवू शकेल. यापूर्वी आपण अनेक संकटांवर असाच विजय मिळवला.

सध्याच्या काळात आनंदी राहणे सर्वात कठीण झाले आहे. जगभरात जे घडत आहे ते पाहून आपण आनंदाचा विचार तरी कसा करू शकतो? हा स्वाभाविक प्रश्न आहे. सगळे काही व्यवस्थित सुरू असेल तर प्रत्येक जण आनंदी राहू शकतो. ते खूप सोपे आहे. त्यासाठी परिपक्वतेची गरज नसते. पण या परिस्थितीतही मी आनंद मिळवू शकतो का? जग अशा संकटातून जात असताना सुखाबद्दल विचार करणेदेखील योग्य आहे का?

परंतु, मी हसण्याचे धैर्य दाखवतो. सर्वांना सुप्रभात आणि शुभेच्छा देऊन अभिवादन करतो. या परिस्थितीतही. विश्वास ठेवा, जे घडत आहे त्याबद्दल मी डोळे झाकून बसलेलो नाही. पण मी काय बघतोय ते मला सांगायचे आहे. सर्वप्रथम अदृश्य जीवाने संपूर्ण जग कसे थांबवले, याची जाणीव होय. माणूस म्हणून आपण इतकी प्रगती केली, बरेच साध्य केले, परंतु एका अदृश्य जीवाने संपूर्ण जगाला आपल्या नियंत्रणाखाली घेतले, सर्वांचे जीवन ताब्यात घेतले, हे चिंताजनक वाटू शकते. म्हणजे अनेक गोष्टी त्रासदायक आहेत, परंतु विश्वासही खूप आहे.

आपल्याला या अदृश्य जीवाशी लढायचे आहे तर आपल्याला अदृश्य शक्तीकडूनच सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणूनच प्रार्थनेवर आणि त्या अलौकिक शक्तीवर विश्वास कायम आहे, जो आपल्याला आरपार पाहू शकतो. या संकटादरम्यान सर्व धार्मिक स्थळांचे दरवाजे बंद राहिले, परंतु आरोग्य सुविधा देणाऱ्यांची दारे खुली राहिली. या टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी डॉक्टर आपल्याला मदत करत आहेत. म्हणूनच अत्यंत कृतज्ञतेची भावना आहे.

या वेळी विज्ञानाबद्दलही खूप आदर आहे, कारण आपण सामना करत असलेली ही पहिली महामारी, पहिला विषाणू नाही. आणि विज्ञानाने यापूर्वी अनेक महामाऱ्या, विषाणूंवर विजय मिळवला आहे. या वेळी विषाणूने अचानक हल्ला केला आणि आपण कठीण परिस्थितीतून जात आहोत. पण, माझा विज्ञानावर विश्वास आहे. आपल्याला कोरोनावर लस मिळेल आणि भविष्यात त्यावर उपचार केले जातील, जसे आपण पूर्वी केले आहे. हे संकट मोठे वाटते कारण मृत्यूंची संख्या मोठी आहे, परंतु यापेक्षा जास्त संख्येने लोक त्यातून बरे झाले आणि आता सामान्य जीवन जगताहेत. आपण सर्व मिळून कोरोनाशी लढत आहोत हे प्रशंसनीय आहे आणि वैयक्तिक जागरूकतेची शक्ती दिसून येत आहे.

मला एवढेच सांगायचे आहे की, आपल्याला काय नको आहे ते आपण आयुष्यात कधीही सांगू नये. त्याऐवजी आपल्याला काय हवे आहे ते जीवनाला सांगा व आजच्या दिवसाला आरपार पाहावे, ही जीवनाकडून अपेक्षा करतो. केवळ मानवतेची एकत्रित शक्ती, अध्यात्माबद्दल आस्था व विज्ञानावरील विश्वास आपल्याला जिंकवू शकेल. यापूर्वी आपण अनेक संकटांवर विजय मिळवला, यांच्या साहाय्याने आपण या संकटावरही मात करू. आपण दीर्घायुषी होऊ आणि या सर्व परिस्थितीवर कशी मात केली, हे पुढच्या पिढीला सांगू. आपल्या भूतकाळाबद्दल नेहमी लक्षात राहणारे हे एक ऐतिहासिक सत्य होईल आणि आपण जीवनाच्या या टप्प्याच्या आरपार पाहू शकू.

माझा मानवी सामर्थ्याच्या संयुक्त शक्तीवर ठाम विश्वास आहे. सावधगिरी बाळगा, तुम्हाला सांगितलेली सर्व खबरदारी घ्या. निष्काळजीपणाने वागू नका, अहंकाराला सध्या काहीही जागा नाही. जेव्हा हे संकट संपेल तेव्हा आपण खरोखर आनंदी होऊ, तेव्हा आपल्याला भीतीच्या सावटाखाली आनंदी राहावे लागणार नाही. तुम्ही मला भोळा समजाल, पण मी विचारांनी संधिसाधू आहे. मी मनाचा चुंबकासारखा वापर करतो. मला हवे असते त्याला आकर्षित करतो, नको असलेले मागे हटवतो. आणि अशा प्रकारे या परिस्थितीत दु:खाऐवजी आनंदाची निवड करतो. तुम्हीही असे करू शकता. मग तुम्ही, मी, माणुसकी सारेच खुश.

महात्रया रा
आध्यात्मिक गुरू