आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामायणाची शिकवण:जोडीदाराचा सल्ला अडचणींपासून दूर ठेवू शकतो, रावणाने मंदोदरीचे ऐकले नाही आणि नष्ट झाला त्याचा संपूर्ण वंश

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती-पत्नीने एकमेकांच्या सल्ल्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जोडीदाराचा सल्ला ऐकल्यास जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. येथे श्रीरामचरितमानसमधील रावण आणि मंदोदरीच्या या प्रसंगावरून जाणून घ्या, पती-पत्नीसाठी सुखी जीवनाचे सूत्र ...

रावणाने ऐकला नाही मंदोदरीचा सल्ला
प्रसंगानुसार, रावणाने देवी सीतेचे हरण करून त्यांना लंकेतील अशोक वाटिकेमध्ये ठेवले होते. सीतेचा शोध घेत प्रभू श्रीराम आपल्या वानर सेनेसोबत समुद्र पार करून लंकेत पोहोचले होते. ही बातमी मंदोदरीला समजल्यानंतर तिच्या लक्षात आले की, श्रीराम हे सामान्य व्यक्तित्व नाही. रावणाचा पराभव होणार असल्याचे संकेत तिला मिळू लागले. यामुळे ती पती रावणाकडे गेली आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागली. मंदोदरीने रावणाला श्रीरामासोबत शत्रुत्व घेऊ नये असा सल्ला दिला. देवी सीतेला सकुशल परत करण्यास सांगितले. असे न केल्यास लंकेचा नाश होईल. श्रीराम स्वयं भगवान विष्णूंचा अवतार असल्याचे सांगिलते. समुद्रावर सेतू बांधून श्रीराम आपल्या विराट वानर सेनेसोबत लंकेत पोहोचले आहेत. युद्ध झाल्यास पराभव निश्चित आहे. एवढे सांगूनही रावणाने मंदोदरीचे काहीही ऐकले नाही आणि युद्धास सज्ज झाला. श्रीरामांसोबत युद्ध केले आणि आपले सर्व पुत्र आणि भाऊ कुंभकर्णासोबत मृत्युमुखी पडला.

प्रसंगाची शिकवण
वैवाहिक जीवनात सुख-शांती कायम ठेवण्यासाठी पती आणि पत्नी दोघांनीही एकमेकांना चुकीची कामे करण्यापासून रोखावे. दोघांनीही एकमेकांच्या योग्य सल्ला मान्य करावा. यामुळे जीवन सुखी राहते. एकमेकांचे दोष दूर करून संसाराचा ताळमेळ साधल्यास अडचणी दूर होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...