आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संस्कार:मुलांना चांगल्या कामासाठी प्रेरित करावे, तरच ते मोठे होऊन चांगला माणूस बनतील

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • साधू लहान मुलीला म्हणाले, 'पैसे नसतील तर अंगणातील माती दान म्हणून दे पण भिक्षेसाठी नाही म्हणू नकोस'

एका पारंपारिक कथेनुसार पुरातन काळात एक साधू आपल्या शिष्यासोबत भिक्षा मागत-मागत एका घराजवळ पोहोचले. साधूंनी भिक्षा देण्यासाठी आवाज दिला. आवाज ऐकून एक लहान मुलगी बाहेर आली आणि म्हणाली - बाबा आम्ही खूप गरीब आहोत. आमच्या तुम्हाला देण्यासाठी काही नाही आहे. तुम्ही पुढे जा. यानंतर साधू मुलीला म्हणाले - मुली, नाही म्हणू नकोस. तुझ्याकडे देण्यासाठी काही नसेल तर तुमच्या अंगणातील थोडी माती मला भिक्षा म्हणून दे.

> मुलीने लगेच अंगणातील एक मुठ माती उचलली आणि भिक्षा पात्रात टाकली. साधूने मुलीला आशीर्वाद दिला आणि पुढे निघून गेले. काही अंतरावर गेल्यानतंर शिष्याने साधूंना विचारले की, गुरुजी माती ही घेण्याची गोष्ट आहे का? तुम्ही भिक्षेत माती का घेतलीत?

> यावर साधूने शिष्याला म्हणाले - आज ती मुलगी लहान आहे. ती आज नकार द्यायला शिकली तर मोठी झाल्यावर कोणालाही दान देणार नाही. आज तिने दानामध्ये थोडीशी माती दिली आहे. यामुळे तिच्या मनात दान देण्याची भावना जागृत होईल. ही मुलगी मोठी होऊन सामर्थ्यवान झाली तर दानात फळ-धान्य आणि धन देईल.

कथेची शिकवण

- मुलांना लहानपणापासूनच चांगले कर्म करण्यास सांगायला हवे. मुलांनी लहानपणीच चांगले कर्म करण्यासाठी प्रेरित केले तर ते मोठे होऊन चांगला माणूस बनतील आणि वाईटापासून दूर राहतील. आपण दान करताना नेहमी लहान मुलांकडून ते करवून घ्यावे यामुळे मुलं दुसऱ्यांची मदत करणे शिकतील.

बातम्या आणखी आहेत...