आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शनिवार 17 ऑक्टोबरपासून देवी पूजेचा महापर्व नवरात्र सुरु झाला आहे. हा उत्सव रविवार 25 ऑक्टोबरपर्यंत राहील. नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध प्राकाराच्या पूजा केल्या जातात. व्रत-उपवासही देवी पूजेचे एक अंग आहे. व्रताचा अर्थ आहे संकल्प किंवा दृढ निश्चय. उपवासचा अर्थ आहे ईश्वराच्या जवळ बसने. व्रत-उपवास केल्याने शारीरिक, मानसिक आणि धार्मिक लाभ होतात. नवरात्रीमध्ये करण्यात आलेल्या व्रतामुळे आपले शरीर निरोगी राहते.
नवरात्रीमध्ये का केले जातात व्रत-उपवास
> एक वर्षामध्ये चार नवरात्र येतात. एक नवरात्री चैत्र मासात, एक अश्विन मासात आणि इतर दोन नवरात्र माघ आणि आषाढ मासात येतात आणि या दोन नवरात्रीत गुप्त नवरात्री म्हटले जाते.
> जेव्हा दोन ऋतूंचा संधीकाळ म्हणजे एक ऋतू बदलतो आणि दुसरा सुरु होतो त्या काळात नवरात्र साजरी केली जाते.
> ऋतूंच्या संधीकाळात आजार होण्याची शक्यता जास्त वाढते. यामुळे या काळात आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. खाण्यापिण्यात कोणताही प्रकराची गडबड होऊ नये, यासाठी नवरात्रीमध्ये व्रत-उपवास करण्याची प्रथा चालू करण्यात आली.
व्रतामुळे होतात आरोग्य लाभ
> व्रत-उपवासाने शरीर निरोगी राहते. निराहार राहिल्याने, एक वेळेस जेवण केल्याने किंवा फलाहार घेतल्याने पचनतंत्रला आराम मिळतो.
> व्रत केल्याने गॅस, ऍसिडिटी, अजीर्ण, अरुची, डोकेदुखी, ताप, लठ्ठपणा यासारख्या विविध रोगांपासून बचाव होतो. अध्यात्मिक शक्ती वाढते. ज्ञान, विचार, पवित्रता आणि बुद्धीचा विकास होतो. यामुळे उपवास व्रताला पूजन पद्धतीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.