आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज सूर्य पूजेचा सण:धनु संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याची, गरजूंना वस्त्र दानाची प्रथा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

16 डिसेंबर म्हणजेच आज सूर्य धनु राशीत प्रवेश करत आहे. याला सूर्य संक्रांत म्हणतात. या दिवशी तीर्थस्नान, दान आणि पूजा याला अधिक महत्त्व आहे. सकाळी 10 वाजता सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करतील.

पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र स्पष्ट करतात की, सूर्याचा एखाद्या राशीत प्रवेशास संक्रांती म्हटले जाते. सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो त्याला धनु संक्रांती म्हणतात. मार्गशीर्ष मासात धनु संक्रांती येते. यावेळी 16 डिसेंबरला धनु संक्रांती आहे. या दिवशी सूर्य वृश्चिक राशी सोडून धनु राशीत प्रवेश करतो.

सूर्याच्या नारायण रूपाची पूजा
धनु संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या नारायण रूपाची पूजा करण्याचे खूप महत्त्व आहे. हे भगवान श्रीविष्णूचे नाव आहे. पुराणात सूर्याला भगवान विष्णूचा अंश म्हटले आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचे विधान शास्त्रात सांगितले आहे. या दिवशी पवित्र नद्यांच्या पाण्यात स्नान केल्याने कळत-नकळत झालेले पाप-दोष नष्ट होतात. रोग दूर होतात. या दिवशी सूर्याची उपासना केल्याने आयुष्य आणि भाग्यही वाढते.

संक्रांतीच्या दिवशी दान केल्यास अक्षय पुण्य मिळते
धनुसंक्रांतीचा सण साजरा करणाऱ्यांनी दिवसभर ब्रह्मचर्य पाळावे. दिवसभर गरजू लोकांना कपडे आणि अन्न दान करावे. असे केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. या दिवशी मीठ न खाण्याचा प्रयत्न करावा. या सणात भगवान सूर्य, विष्णू आणि शिवजींची पूजा करावी. याशिवाय पितरांच्या शांतीसाठी तर्पण अर्पण करण्याचेही महत्त्व आहे.

धनु संक्रांतीच्या दिवशी गाईचे दान खूप महत्वाचे मानले जाते. शास्त्रानुसार या संक्रांतीला गाय दान केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. संकटेही दूर होतात. जर तुम्ही गाय दान करू शकत नसाल तर गाईसाठी एक किंवा त्यापेक्षा जास्त दिवस चारा दान करा. अशा प्रकारे दान केल्याने पापांचा नाश होतो.

सूर्याला अर्घ्य देण्याचा विधी
- सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे, नंतर उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे. पूजा करून दिवसभर व्रत आणि दानाचा संकल्प करावा.
- पिंपळ आणि तुळशीला जल अर्पण करावे. यानंतर गाईला गवत-चारा किंवा धान्य द्यावे.
- गरजू लोकांना अन्नदान आणि कपडे दान करा.
- पितरांच्या शांतीसाठी तर्पण करावे.

बातम्या आणखी आहेत...