आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंवत्सरातील शेवटची आणि इंग्रजी कॅलेंडरमधील पहिली गुप्त नवरात्री 22 जानेवारीपासून सुरू झाली असून 30 तारखेपर्यंत राहील. माघ महिन्यात येणारी ही नवरात्र आहे. या दिवसांत देवीची दहा महाविद्या स्वरूपात पूजा व उपासना केली जाते. या नवरात्रीचे शक्ती आणि सिद्धिंमध्ये विशेष महत्त्व आहे. या दिवसांमध्ये तिळकुंद, वसंत पंचमी आणि सूर्यदेवाची रथसप्तमी हे सणही असतील. त्यामुळे ही नवरात्र आणखी खास बनत आहे.
नवरात्र वर्षातून चार वेळा येते. यापैकी दोन प्रकट आणि दोन गुप्त नवरात्री आहेत. चारही सिद्धी देणाऱ्या आहेत. असे मानले जाते की, गुप्त नवरात्रीमध्ये पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि संकटांपासून मुक्ती मिळते. गुप्त नवरात्रीमध्ये, साधक संन्यासी सिद्धी प्राप्त करण्यासाठी देवीची पूजा करतात. तर प्रकट नवरात्रीमध्ये गृहस्थ जीवनात राहणारे लोक देवीच्या 9 रूपांची पूजा करतात.
अशाप्रकारे करावे पूजन
गुप्त नवरात्रीत नऊ दिवस कलशाची स्थापना केली जाते. कलशाची स्थापना केल्यानंतर सकाळ संध्याकाळ मंत्र जप, चालीसा किंवा सप्तशती पाठ करावेत. तसेच आरती करावी. दोन्ही वेळी देवीला नैवेद्य दाखवावा. सर्वात सोपा आणि उत्तम नैवेद्य म्हणजे लवंग आणि बताशा. देवीसाठी लाल फूल सर्वोत्तम आहे. संपूर्ण नऊ दिवस आहार सात्विक ठेवावा.
या देवींची केली जाते पूजा : गुप्त नवरात्रीमध्ये देवीच्या 10 महाविद्यांची पूजा केली जाते. काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छित्रमस्तका, धुमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला अशी त्यांची नावे आहेत.
25 रोजी तिळकुंद चतुर्थी
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्रीगणेशाची तीळ अर्पण करून पूजा करावी. या तिथीला सकाळी लवकर उठून श्रीगणेशाची पूजा करण्याबरोबरच दिवसभर उपवास करण्याचा संकल्प घ्यावा. त्यानंतर दिवसभर उपवास करून सायंकाळी श्रीगणेशाची पूजा करून तीळ अर्पण करून चंद्राला अर्घ्य द्यावे. हे व्रत आणि उपासना केल्याने सुख आणि सौभाग्य वाढते.
26 रोजी वसंत पंचमी
माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीच्या पाचव्या तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. या तिथीला, देवी सरस्वतीची पूजा करून ज्ञान आणि बुद्धीसाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी विद्यारंभ संस्कार करून अनेक मुलांच्या शिक्षणाची सुरुवात केली जाते. मुलांना पहिला शब्द लिहायला शिकवले जाते.
28 रोजी रथसप्तमी
माघ मासाच्या गुप्त नवरात्रीच्या सातव्या तिथीला सूर्याची पूजा करण्याचे विधान पुराणात सांगितले आहे. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी तीर्थस्नान करावे. असे मानले जाते की, या वेळी तीर्थस्नान केल्याने रोग दूर होतात आणि आरोग्य चांगले राहते. या कारणास्तव रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.