आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पहिला श्रावण सोमवार:अशाप्रकारे घरातच करावी महादेवाची पूजा, प्राप्त होऊ शकते सुख-समृद्धी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येक महिलेने अशाप्रकारे वाहावी शिवमूठ

सध्या श्रावण महिना सुरु असून (27 जुलै) पहिला श्रावणी सोमवार आहे. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर दररोज जल अर्पण करणे आवश्यक आहे. विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. या उपायाने महादेवाची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. देवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होऊन अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, सोमवारी महादेवाची पूजा करण्याचा आणि महिलांनी शिवमूठ वाहण्याचा सामान्य विधी...

असे करावे महादेवाचे पूजन
सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर घरातच व्रत करण्याचा संकल्प करावा. या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करावे. दिवसा फलाहार तसेच दुध घेऊ शकता.

संकल्प घेतल्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीचे दुध अर्पण करावे. त्यानंतर फुल, तांदूळ, कुंकू, बेलाचे पान अर्पण करावे. या सर्व गोष्टी अर्पण करताना शिव मंत्र - ऊँ महाशिवाय सोमाय नम: किंवा ऊँ नम: शिवाय। या मंत्राचा जप करा.

जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ श्रेष्ठ ठरते. या सोप्या पद्धतीने महादेवाची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त करू शकता.

प्रत्येक महिलेने वाहावी शिवमूठ
पहिल्या सोमवारी तांदूळ, गंध, फुले व दूध शिवामूठ वाहायची. ती वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर देवा ही, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. या दिवशी सायंकाळपर्यंत उपवास करावा. उष्टे खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून देवास बेल वाहावा. अशा प्रकारे व्रत पार पाडतात.