आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१२ महिने १३ उत्सव’ अशी पुरीत म्हण आहे. परंपरांचे समर्पण भावनेने पालन केले जाते. कोरोनामुळे सोमवारी सलग दुसऱ्या वर्षी भक्तांशिवाय प्रभू जगन्नाथ यांची रथयात्रा निघेल. मुख्य पुजारी जनार्दन पट्टाजोशी महापात्रा यांच्यानुसार यात्रेसाठी दरवर्षी नवीन रथ तयार केले जातात. वसंत पंचमीला काष्ठ संग्रहापासून तयारी तर अक्षय्यतृतीयेला कामाला सुरुवात होते. भ. जगन्नाथ यांची २१ दिवसांची चंदन यात्रा सुरू होते. स्नान पौर्णिमेला जगन्नाथजी, बलभद्रा व सुभद्रा यांना १०८ कळसांनी अंघोळ घातली जाते. यानंतर ते आजारी पडल्यास त्यांना एकांत कक्षात (क्वाॅरंटाइन) ठेवले जाते. १५ दिवस महाप्रभूंना छप्पन भोग न दाखवता फलाहार व औषधांचा भोग लावला जातो. अमावास्येला जगन्नाथजी ठीक होतात व एक दिवस आधी भक्तांना त्यांचे नवयौवन दर्शन घडवले जाते. सोमवारी सकाळी मंगल आरतीने रथयात्रेला सुरुवात होईल. सोना पटालागी, पोहंडी विजे विधी होईल. सोना पटालगी विधी म्हणजे मंदिरातून रथापर्यंत नेताना दुखापत होऊ नये म्हणून तीनही भावा- बहिणींना रेशमी धागा बांधला जातो. निघण्याआधी महाप्रभूंना फुलांचा मुकुट घातला जातो, त्याला ताहिया म्हणतात.
रथात स्वार झाल्यानंतर पुरीचे महाराज जे जगन्नाथजींचे प्रथम सेवक आहेत, छेरा पाेंहरा विधी करतील. या विधीत ते सिंहासनाच्या चारही बाजूंना स्वर्णजडित झाडू मारतील. ही परंपरा स्वच्छतेचा (सॅनिटेशन) संदेश देते. भाऊ- बहीण वेगवेगळ्या रथांत जातात. ही परंपरा दोन मीटर अंतराचा (फिजिकल डिस्टन्सिंग) संदेश देते. रथ गुंडिचा मंदिरात पोहोचल्यानंतर श्रृगांरासारखे विधी रथावरच केले जातील. दुसऱ्या दिवशी भाऊ- बहीण मावशीच्या घरी जातील व ८ दिवस तेथेच राहतील. तिसऱ्या दिवशी हेरा पंचमीला श्रीमंदिरातून लक्ष्मीजी गुंडिचा मंदिरात जातील, मात्र पती जगन्नाथ यांची भेट होत नाही, यामुळे त्या रागात जगन्नाथजी यांच्या रथाचे एक चाक तोडून परत जातील. नवव्या दिवशी २० जुलैला तीनही भाऊ- बहीण मंदिराबाहेर रथातच आराम करतील.
पुजारी जनार्दन पट्टाजोशी महापात्रा यांनी सांगितले की, २१ जुलैला महाप्रभू रथावर सुवर्ण आभूषण घालून दर्शन देतील. मंदिरात प्रवेश करताना बलभद्र, सुभद्रा व सुदर्शन यांना मंदिरात प्रवेश दिला जाईल, मात्र लक्ष्मी प्रतिनिधी सेवायत जगन्नाथ यांचा मार्ग अडवतील. तेव्हा दोघांच्या प्रतिनिधींमध्ये वाद होईल. शेवटी भगवान जगन्नाथ लक्ष्मी यांचे मन वळवतील. रथयात्रा झाल्यावर रथाचे विसर्जन केले जाते. रथासाठी वापरलेली सामग्री स्वयंनष्ट (बायोडिग्रेेडेबल) होणार आहे. या लाकडांचा पूजाविधी वगळता इतर देवाच्या कामात वापर केला जातो. काही भाग मंदिराच्या स्वयंपाकघरात वापरले जातात किंवा मंदिराच्या मोठ्या दानदात्यांना रथाचे भाग म्हणजे चाक, सिंहासन, छत्र, मूर्ती आदी दिल्या जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.