आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैत्र नवरात्री:5 एप्रिलला चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस; दीर्घायुष्य, शक्ती आणि उत्तम आरोग्यासाठी करावी कुष्मांडा देवीची उपासना

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्र नवरात्रीच्या चौथ्या दिवसाची (5 एप्रिल, मंगळवार) प्रमुख देवी कूष्मांडा आहे. देवी कूष्मांडा रोगांना त्वरित नष्ट करणारी आहे. या देवीची भक्ती करणार्‍या व्यक्तीला धन-धान्य आणि सुख-समृद्धीसहित उत्तम आरोग्य प्राप्त होते.

पूजन विधी -
सर्वात पहिले चौरंगावर किंवा पाटावर कूष्मांडा देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. चौरंगावर चांदी, तांबे किंवा मातीचा कलश स्थापन करून त्यामध्ये पाणी भरून त्यावर नारळ ठेवा. त्यानंतर चौरंगावर श्रीगणेश, वरुण, नवग्रह, षोडश मातृका (16 देवी) ची स्थापना करावी. त्यानंतर व्रत, पूजांचा संकल्प घ्यावा.

वैदिक आणि सप्तशती मंत्राचा उच्चार करून कूष्मांडासहित सर्व स्थापित देवतांची षोडशोपचार पूजा करावी. यामध्ये आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, सौभाग्य सूत्र, चंदन, रांगोळी, हळद, शेंदूर, दुर्वा, बिल्वपत्र, दागिने, फुलं-हार, सुगंधित द्रव्य, धूप-दीप, नैवेद्य, फळ, पान, दक्षिणा, आरती, प्रदक्षिणा, मंत्र पुष्पांजलि इ. गोष्टी कराव्यात.

ध्यान मंत्र
सुरासम्पूर्णकलशं रूधिराप्लुतमेव च।
दधानाहस्तपद्याभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे॥

अर्थ - अष्टभूजा देवीचे हे स्वरूप, जिने आपल्या अठरा हातांत अठरा प्रकारची आयुधे धारण केली आहेत. आपल्या स्मित हास्याने कुष्मांडा देवीने ब्रह्मांडाची निर्मिती केली होती. कूष्मांडा देवीच्या पूजनाने आपल्या शरीरातील अनाहत चक्र जागृत होते. या देवीच्या उपासनेने संसारातील जेवढी काही अभिलाषा आहे, ती पूर्ण होते. या देवीला तृष्णा आणि तृप्तीचे कारण मानले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...