आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहा दिवसांचा गणेशोत्सव आजपासून (10 सप्टेंबर) सुरू झाला आहे. सर्वात उंच गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या हैदराबादच्या खेरताबादमध्ये यावर्षी 40 फूट उंच गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी 50 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे. दीडशेहून अधिक कलाकारांनी मिळून ही मूर्ती बनवली आहे.
खेरताबाद गणेश उत्सवाचे आयोजक एस. राजकुमार यांनी सांगितले की, यावर्षी श्रीगणेशाची पंचमुखी रुद्र महागणपती मूर्ती बनवण्यात आली आहे. मूर्ती बनवण्यासाठी दोन महिने लागले. मुख्य कारागीर राजेंद्रन हे आहेत. त्यांच्या 150 हून अधिक कलाकारांच्या टीमने 10 जुलैपासून मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. आंध्र प्रदेश व्यतिरिक्त महाराष्ट्र, मुंबई येथील कलाकार सहभागी झाले होते. चिकणमाती, पीओपी, बांबू इत्यादी गोष्टींच्या मदतीने मूर्ती तयार करण्यात आली आहे.
2019 मध्ये 1 कोटी रुपयांमध्ये बनली होती 61 फूट उंच मूर्ती
गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन होते, त्यामुळे येथे सुमारे 9 फुटांची मूर्ती येथे स्थापित करण्यात आली होती. यापूर्वी 2019 मध्ये 61 फूट उंच मूर्ती बनवण्यात आली होती. मूर्ती बनवण्यासाठी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला होता. कोरोनापूर्वी, येथे भेट देणाऱ्या भाविकांची संख्या लाखांमध्ये होती, परंतु गेल्या वर्षी खूप कमी लोक येथे आले होते. यावर्षीसुद्धा कोरोनाचे संकट पाहता श्रीगणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सॅनिटायझर, सोशल डिस्टेंसिंग, आणि मास्कची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी समितीचे दोनशेहून अधिक सदस्य काम करत आहेत.
दररोज 500 किलोंपेक्षा जास्त फुलांचा हार अर्पण केला जाईल
पंचमुखी महागणपती मूर्तीला दररोज 500 किलो फुलांनी बनवलेला हार अर्पण केला जाईल. हार तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या फुलांचा वापर केला जातो.
विसर्जनामध्ये लाखो भाविक सहभागी होतात
गणेशमूर्तींच्या विसर्जनामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. येथील हुसेन सागर तलावात मूर्तीचे विसर्जन केले जाते. विसर्जनासाठी क्रेनचा वापर केला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.