आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज गणेश चतुर्थी (10, सप्टेंबर) आहे. प्राचीन काळी या तिथीला भगवान श्रीगणेश प्रकट झाले होते. श्रीगणेशाला पूजेमध्ये विशेष गोष्टी अर्पण केल्या जातात, परंतु तुळस अर्पण केली जात नाही. श्रीगणेशाला एकदंतही म्हटले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्याकडून जाणून घ्या, श्रीगणेशाशी संबंधित काही मान्यता आणि त्यामागील कथा...
श्रीगणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
गणपतीला दूर्वा वाहण्याची परंपरा ही खुप जुनी आणि प्राचीन आहे. या पाठीमागची कथा फार प्रचलित आहे. कथेनुसार प्राचीन काळात अनलासुर नावाचा एक दैत्य होता. या दैत्याच्या कोपामूळे स्वर्ग आणि धरतीवर त्राही-त्राही माजली होती. अनलासुर ऋषि-मुनी आणि सामान्य नागरिकांना जिंवत गिळून टाकायचा. दैत्याच्या या त्रासाने त्रस्त होऊन देव इंद्रासहित सर्व देवी-देवता आणि प्रमुख ऋषि-मुनि महादेवाची प्रार्थना करायला लागले. सर्वांनी महादेवाची प्रार्थना केली आणि अनलासुराचा आतंकाचा नाश करण्याची विनंती केली. महादेवाने सर्व देवी-देवतांचे आणि ऋषि-मुनींची प्रार्थना ऐकून सांगितले की, अनलासुराचा अंत केवळ गणपतीच करु शकतो.
महादेव म्हणाले की, अनलासुराचा अंत करण्यासाठी त्याला गिळंकृत करावे लागेल आणि हे काम फक्त गणपती करु शकतो. गणपतीचे पोट बरेच मोठे आहे त्यामुळे अनलासुराला गिळणे सोपे आहे. हे ऐकल्यानंतर सर्व देवी-देवता गणपतीकडे गेले. गणपतीची स्तुती करुन त्यांना प्रसन्न केल्यानंतर श्रीगणेशाने अनलासुराला पकडून गिळंकृत केले. जेव्हा गणपतीने अनलासुराला गिळले त्यानंतर त्याच्या पोटामध्ये जळजळ होण्यास सुरुवात झाली. ब-याच प्रकारचे उपाय केल्यानंतरही गणपतीच्या पोटातील जळजळ शांत होत नव्हती. तेव्हा कश्यप ऋषींनी 21 दूर्वांची जूडी तयार करुन गणपतीला खाण्यास दिली. दूर्वांची जूडी खाल्यानंतर पोटातील जळजळ शांत झाली. तेव्हापासून गणपतीला दूर्वा वाहण्याच्या परंपरेला प्रारंभ झाला.
श्रीगणेशाला तुळस का अर्पण केली जात नाही?
पौराणिक कथेनुसार, राजा धर्मात्मजची कन्या तुळशी ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली होती. तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की श्रीगणेश गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते. त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते. गळ्यात रत्नांची माळ होती. कमरेत रेशमचे पिताम्बर गुंडाळलेले होते. ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करीत होते.
गणपतीचे ते सुंदर स्वरुप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपस्या भंग केली. भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला.
हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की, तुझे एक नाही दोन विवाह होतील. यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की, तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल. हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली.
यानंतर, गणेशजी म्हणाले, तू भगवान विष्णू आणि कृष्णाला प्रिय असल्यामुळे कलयुगात तुझी पूजा करणे मोक्षदायक ठरेल. परंतु तुला माझी पूजा करताना अर्पण करणे अशुभ मानले जाईल. तेव्हापासून श्रीगणेशाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करणे निषिद्ध मानले जाऊ लागले.
श्रीगणेशाचे नाव एकदंत कसे पडले?
एकदा भगवान परशुराम भगवान शंकराला भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर गेले होते. त्यावेळी भगवान शंकर माता पार्वतीसोबत आपल्या गुहेत होते. ते देवी पार्वतीला श्रीरामाची कथा ऐकवत होते. कथेमध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी गणपतीला आज्ञा दिली होती की, कुणालाही गुहेत आत सोडू नये. सोबतच त्यांनी बाप्पाला आपलं त्रिशुळही दिले होते.
जेव्हा भगवान परशुराम कैलाश पर्वतावर पोहोचले, तेव्हा श्रीगणेशाने त्यांना गुहेत जाण्यापासून अडवले.अरशुराम यांनी श्रीगणेशाला आपला रस्त्या अडवू नकोस असे सांगितले. त्यानतणार परशुराम आणि श्रीगणेश यांच्यामध्ये युद्ध झाले. या युद्धादरम्यान श्रीगणेशाचा एक दात तुटला. त्यामुळेच गणेशाला एकदंत हे नाव मिळाले.
श्रीगणेशाला मोदक का प्रिय आहेत?
एका कथेनुसार, माता अनुसूयाने श्रीगणेशाला आपल्या घरी भोजनाचे आमंत्रण दिले होते. भोजनाला बसल्यानंतर श्रीगणेश जेवण्यासाठी बसल्यानंतर ते बराच वेळ जेवत राहिले परंतु त्याचे पोट भरत नव्हते. तेव्हा माता अनुसूयाने मोदक बनवले आणि श्रीगणेशाला वाढले. मोदक खाताच श्रीगणेश तृप्त झाले. तेव्हापासून श्रीगणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा सुरु झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.