आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश स्थापनेला बुधवार-चतुर्थीचा शुभ संयोग:300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला जुळून येत आहे लंबोदर योग

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

31 ऑगस्ट रोजी येणारी गणेश चतुर्थी अनेक अर्थाने विशेष आहे. फक्त चतुर्थीच शुभ नाही तर 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या सात दिवसांमध्ये शुभ योगही तयार होत आहेत. या सात दिवसात तुम्ही केवळ श्रीगणेशाची पूजाच नाही तर तर नवीन व्यवसाय सुरू करण्यापासून घर आणि वाहन खरेदीपर्यंत अनेक शुभ कार्ये करू शकता. देशातील प्रसिद्ध विद्वानांनी या 10 दिवसांतील 7 शुभ मुहूर्त सांगितले आहेत, जे तुमच्यासाठी खास असू शकतात.

31 ऑगस्ट विशेष असण्यामागची 2 मोठी कारणे
पहिले कारण म्हणजे यावर्षी ते सर्व योग जुळून येत आहेत, जे श्रीगणेशाच्या जन्माच्या दिवशी जुळून आले होते. दिवस बुधवार, तिथी चतुर्थी, नक्षत्र चित्र आणि मध्यकाल म्हणजे दुपारची वेळ. जेव्हा देवी पार्वती यांनी मातीचे गणेश बनवले होते आणि त्यात महादेवांनी प्राण ओतले होते. याशिवाय काही दुर्मिळ आणि शुभ योग तयार होत आहेत जे 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत गणेश उत्सवादरम्यान राहतील.

या गणेशोत्सवात एक विशेष गोष्ट अशी आहे की, या 10 दिवसांमध्ये दररोज काही ना काही शुभ योग तयार होत आहेत. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणुकीपासून ते वाहन खरेदीपर्यंत अनेक शुभ कार्ये करू शकाल. त्याचबरोबर असा दुर्मिळ योगही तयार होत आहे, जो गेल्या 300 वर्षांत तयार झाला नाही. या सर्व योगांबद्दल आम्ही केंद्रीय संस्कृत विद्यापीठ मुंबई, तिरुपती आणि पुरीचे ज्योतिषी डॉ.सागर रेड्डी, डॉ.कृष्ण कुमार भार्गव आणि डॉ.गणेश मिश्र यांच्याशी चर्चा केली. जाणून घ्या, त्यांच्या दृष्टीने हा गणेशोत्सव का खूप खास आहे.

डॉ.गणेश मिश्र सांगतात, यावेळी गणेश उत्सवात नवमी तिथी कमी होत आहे. असे असले तरी गणपती उत्सव पूर्ण 10 दिवस राहणार आहे. या दिवसात सूर्य, बुध, गुरू आणि शनि आपापल्या राशीत राहतील. गेल्या 300 वर्षांत असे घडलेले नाही. या संयोगात जर तुम्हाला फ्लॅट बुक करायचा असेल, मालमत्ता, दागिने किंवा वाहन खरेदी करायचे असेल किंवा तुम्हाला टोकन मनी द्यायचे असतील तर त्यासाठी सात शुभ मुहूर्त उपलब्ध असतील.

ग्रह-ताऱ्यांबद्दल बोलताना डॉ.गणेश मिश्र म्हणाले की, यावेळी गुरू ग्रहापासून देह स्थूल योग जुळून येत आहे. याला सोप्या भाषेत लंबोदर योग असेही म्हणतात. जे स्वतः श्रीगणेशाचे नाव आहे. यासोबतच गणपतीच्या जन्माच्या वेळी वीणा, वरिष्ठ, उभयचारी आणि अमला नावाचे योगही तयार होतील. या पाच राजयोगांच्या निर्मितीमुळे यावेळी गणेश स्थापना अत्यंत शुभ असेल.

प्रो. जी. सागर रेड्डी सांगतात की, गणेश चतुर्थीपासूनच पुढील 10 दिवस खरेदीसाठी अनेक शुभ योग जुळून येत आहेत. यानंतर 10 सप्टेंबरपासून श्राद्ध पक्ष सुरू होईल. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी गणेश चतुर्थी हा विशेष मुहूर्त मानला जातो, कारण प्रत्येक दोष गणपतीच्या पूजेने नष्ट होतो, त्यामुळे श्रीगणेशाच्या जन्मतिथी आणि नक्षत्रावर सर्व प्रकारची खरेदी, नवीन सुरुवात, गुंतवणूक आणि व्यवहार करणे शुभ असते.

गणेशोत्सवाच्या उरलेल्या दिवसांबाबत ते सांगतात की, या नऊ दिवसांमध्ये सर्वार्थसिद्धी, राजयोग आणि रवियोग तयार झाल्याने शुभ योग असेल. यामध्येही सात मुहूर्त असतील ज्यामध्ये मालमत्ता आणि दागिन्यांपासून वाहनापर्यंत सर्व प्रकारची खरेदी करणे फायदेशीर ठरेल.

डॉ. कृष्ण कुमार भार्गव सांगतात, 31 तारखेला गणपतीची स्थापना होताच उत्सवांचा कालावधीही सुरू होईल. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असेल. सौभाग्यवती या दिवशी उपवास करून सप्त ऋषींची पूजा करतील. त्यानंतर शुक्रवारी भगवान कार्तिकेयची पूजा होईल. शनिवारी दुर्वाष्टमी असल्याने गणेश मंदिरांमध्ये दुर्वाची विशेष पूजा व सजावट करण्यात येणार आहे. या दिवशी राधाष्टमीचा उपवासही केला जाणार आहे.

नवमी तिथी रविवारी क्षय होईल. त्यानंतर सोम, मंगळ आणि बुध हे तीनही दिवस भगवान विष्णूची पूजा होईल. यामध्ये सोमवारी दहा अवतारांची पूजा, मंगळवारी एकादशीचे व्रत आणि बुधवारी वामन अवताराचा प्राकट्योत्सव यांचा समावेश आहे. गुरुवारी प्रदोष व्रतासह शिव-पार्वतीची पूजा होईल. अनंत चतुर्दशीच्या शेवटच्या दिवशी गणेश विसर्जन होईल.

बातम्या आणखी आहेत...