आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश चतुर्थीला कसे असतील ग्रहांचे योग:बुधवारी गणेशोत्सव सुरू होत असल्याने वाढले आहे याचे महत्त्व

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 31 ऑगस्टपासून दहा दिवसांचा (9 सप्टेंबरपर्यंत) गणेशोत्सव सुरू होत आहे. यावेळी बुधवारपासून या उत्सवाला सुरुवात होत असल्याने याचे महत्त्व अधिक वाढले आहे. बुधवारी श्रीगणेशासोबतच बुध ग्रहाचीही विशेष पूजा करावी.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार बुधवारी श्रीगणेश तसेच बुध ग्रहाची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. उत्तर भारतात बुधवारचे देवता श्रीगणेश मानले जातात, तर या दिवसाचा ग्रह स्वामी बुध आहे.

31 ऑगस्ट रोजी ग्रहांची स्थिती अशी राहील
गणेश उत्सव बुधवारपासून सुरू होणार असून, या दिवशी बुध आपल्या कन्या राशीत चंद्रासोबत राहील. कन्या राशीत बुध उच्चेचा राहतो. यावेळी संपूर्ण दहा दिवस बुध ग्रह उत्तम स्थितीत असेल. सूर्य, शनि आणि गुरु सुद्धा आपापल्या राशीत राहतील. सूर्य सिंह राशीत, गुरू मीन राशीत आणि शनि मकर राशीत असेल.

चित्रा नक्षत्रात हा उत्सव सुरू होत आहे. या नक्षत्राचा अधिपती ग्रह मंगळ आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी धनिष्ठा नक्षत्र राहील. या नक्षत्राचा स्वामीही मंगळ आहे. दक्षिण भारतात मंगळवार हा श्रीगणेशाचा दिवस मानला जातो. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सर्वांसाठीच मंगलमय ठरणार आहे.

अशा प्रकारे तुम्ही श्रीगणेशाची साधी-सोपी पूजा करू शकता
जर एखाद्या व्यक्तीला श्रीगणेश पूजेची विधिव्रत पद्धत माहित नसेल तर त्याने येथे सांगितलेल्या सोप्या स्टेप्सनुसार पूजा करावी.

श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यावर देवाला जल अर्पण करावे. त्यानंतर पंचामृत अर्पण करावे. हार आणि फुलांनी शृंगार करावा. दुर्वा अर्पण कराव्यात. आंब्याची पाने आणि नारळाने कलश सजवा. कुमकुम आणि चंदनाचा टिळक लावावा. मोदक, लाडू आणि हंगामी फळे अर्पण करा.

धूप आणि दिवे लावून आरती करावी. पूजेत श्रीगणेशाय नमः मंत्राचा जप करावा. शेवटी, कळत-नकळत केलेल्या चुकांबद्दल देवाकडे क्षमा मागावी. अशा प्रकारे भगवंताची उपासना करता येते. पूजेनंतर प्रसाद वाटून स्वतः घ्यावा.

बातम्या आणखी आहेत...